Fan Chanting Rishabh Pant Name When Urvashi Rautela Attending College Fest  esakal
क्रीडा

Video : 'ऋषभ पंत' नाव काही उर्वशी रौतेलाची पाठ सोडेना!

अनिरुद्ध संकपाळ

मायदेशात होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मैदानात चाहत्यांना ऋषभ.. ऋषभ.. ची घोषणाबाजी देण्याची संधी मिळाली नाही. मात्र ऋषभ पंतच्या चाहत्यांनी त्याची कसर उर्वशी रौतेलाच्या एका कार्यक्रमात भरून काढली. उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) एका कॉलेज फेस्टमध्ये सहभागी झाली होती. तेथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत प्रमुख पाहूणी म्हणून गेलेल्या उर्वशीचे स्वागत ऋषभ.. ऋषभ... च्या जयघोषाने झाले. यावेळी उर्वशीने यावर प्रतिक्रिया न देता हसतमुखाने पुढचा रस्ता धरला. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की त्याला एका तासातच 16 हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले. मध्यंतरी ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या अफेअरची खमंग चर्चा सुरू होती.

ऋषभ पंत संध्या केएल राहुलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावले आहेत. दिल्लीतील सामन्यात आफ्रिकेने भारताचा 7 विकेट तर कटकमधील सामन्यात 4 विकेट्स राखून पराभव केला.

आता टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पुढचा सामना जिंकणे आवश्यक आहे. मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. जर हा सामना भारताने गमावला तर मालिका हातातून जाईल तसेच ऋषभ पंतच्या नेतृत्व गुणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT