IND vs NZ 2nd esakal
क्रीडा

IND vs NZ 2nd: दुसऱ्या सामन्यात संजूला डच्चू दिल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात संजूला स्थान नाही

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ माउंट माउंगानुई येथे दुसरा टी-२० सामना खेळत आहे. मात्र, टीम इंडियाबद्दल सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. (Fans empathize with Samson after his exclusion from Playing XI in 2nd T20I)

या मालिकेत संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसनचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. संजूला पुन्हा एकदा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आल्याने चाहते तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये न दिसल्याने चाहते चांगलेच संतापलेले दिसत आहेत. चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. याआधीही संजूची टी-20 विश्वचषक 2022 च्या संघात निवड न झाल्याने चाहते संतापलेले दिसले होते. आता पुन्हा एकदा चाहत्यांची नाराजी दिसून येत आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या या निर्णयावर चाहते खूपच नाराज आहेत.

संजूने 2015 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तेव्हापासून तो टीम इंडियासाठी केवळ 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT