INDvsENG  
क्रीडा

INDvsENG : राहुलच्या 'लॉर्ड्स'वरील शतकावर सासरेबुवा प्रसन्न

सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अभिनेता सुनील शेट्टीने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सुशांत जाधव

भारतीय संघाचा युवा सलामीवीर केएल राहुलने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 'लॉर्ड' खेळी साकारली. पहिल्या डावात सुरुवातीला संयमी खेळ करणाऱ्या लोकेश राहुलने क्रिकेटच्या पंढरीत शतक साजरे केले. लॉर्ड्सच्या मैदानात शतकी खेळी करणारा भारताचा तो तिसरा सलामीवीर ठरलाय. पहिल्या डावात त्याने 129 धावांचे योगदान दिले. लोकेश राहुलने पहिला दिवस एकतर्फी भारताच्या नावे केला. त्याने पहिल्या दिवशीच शतक पुर्ण केले. दुसऱ्या दिवशी मात्र आपल्या खेळीत अवघ्या 2 धावांची भर घालून माघारी परतावे लागले. त्याच्या या धमाकेदार खेळीचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अभिनेता सुनील शेट्टीने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याने ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यात लॉर्ड्सवरील शतकी खेळीनंतर लोकेश राहुल बॅट उंचावून आनंद व्यक्त करताना दिसतोय. सुनील शेट्टीच्या ट्विटचे थेट त्याची मुलगी अथिया शेट्टीची कनेक्शन असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसते. एवढेच नाही तर अथिया-राहुलचं लग्न कधी? असा प्रश्नही काही नेटकरी विचारताना दिसते.

राहुल आणि अथिया यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चा नव्या नाहीत. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत डेट करत आहेत. दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्टचा खेळ त्यांच्या प्रेमाची साक्ष देत असतो. अथियाने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुलच्या शतकाचा आनंद व्यक्त केला आहे. अथियासोबत सुनील शेट्टीच्या अधिकृत अकाउंटवरुन पहिल्यांदाच लोकेश राहुलच्या खेळाला दाद मिळाल्यामुळे याची चर्चा अधिक होताना दिसते. सुनील शेट्टीने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, क्रिकेटच्या पंढरीत शतक, खूप सुंदर खेळलास बाबा! या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. अथिया आणि राहुलचं नातं पक्क झाले, असे समजायचे का? असा प्रश्नही काहींनी उपस्थितीत केलाय. लोकेश राहुलने पहिल्या डावात 250 चेंडूत 129 धावा केल्या. यात 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

अथिया शेट्टी आणि लोकेश राहुल ही जोडी अनेकदा एकत्र दिसली आहे. सध्याच्या घडीला अथिया देखील इंग्लंडमध्येच आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघाला विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी केएल राहुल आणि अथिया यांनी एकत्र वेळ घालवल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT