farmer daughter baljeet kaur 
क्रीडा

शेतकऱ्याच्या मुलीने रचला इतिहास; 'ल्होत्से’ शिखर केले सर

२५ दिवसांत ८ हजारपेक्षा जास्त उंचीवरील चार शिखर सर

सकाळ ऑनलाईन टीम

भारताची २७ वर्षीय गिर्यारोहक बलजित कौर हिने रविवारी इतिहास रचला. तिने ‘ल्होत्से’ हे ८५१६ मीटर उंचीवरील शिखर सर करीत यशाच्या नव्या शिखरावर पाऊल ठेवले. यासह ती २८ एप्रिल ते २२ मे या २५ दिवसांच्या कालावधीत ८ हजारपेक्षा जास्त मीटर उंचीवर असलेले चार शिखर सर करणारी ती पहिलीच गिर्यारोहक ठरली. तिच्या कामगिरीवर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बलजित ही मूळची हिमाचल प्रदेशची. तिने मिंगमा शेर्पा यांच्या मार्गदर्शनात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पहिल्यांदा तिने २८ एप्रिल रोजी अन्नपूर्णा शिखर सर केले. या शिखराची उंची ८०९१ मीटर इतकी होती. त्यानंतर बलजीतने ८५८६ मीटर उंचीवरील कांचनजुंगा हे शिखर १२ मे रोजी सर केले. प्रतिष्ठेच्या जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट(८८४८.८६ मी.) शिखरावर तिने २१ मे रोजी तिरंगा फडकाविला. अखेरीस आता २२ मे रोजी ल्होत्से शिखर तिने सर करीत देदीप्यमान कामगिरी केली.

अशाप्रकारे, २५ दिवसांमध्ये चार शिखर सर करणाऱ्या बलजीतचे पीक प्रमोशन माउंटेनिरिंग व ट्रेकिंगचे चेअरमन केशाब पॉडयाल यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘बलजितची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. एका मोसमात चार शिखर सर करणे कठीण काम असते. तिने हे करून दाखवले आहे. ज्यामुळे ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. आमची कंपनी आयोजक असल्यामुळे नक्कीच अभिमान वाटत आहे,’’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

बलजितला शाळेतच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. मात्र आर्थिक अडचणीमुळे तिला ही आवड जोपासण्यासाठी अनेक अडचणी आल्या.

दुसरीच महिला ठरली

एव्हरेस्ट व ल्होत्से हे दोन शिखर २२ तासांच्या आतमध्ये सर करणारी बलजित ही भारताची दुसरी महिला ठरली. पश्‍चिम बंगालच्या चंदा गायेन हिने २०१३ मध्ये माउंट एव्हरेस्ट व ल्होत्से २२ तासांच्या आतमध्ये सर केले होते. आता बलजित हिने त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बलजितने शनिवारी माउंट एव्हरेस्ट आणि रविवारी ल्होत्से शिखर सर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT