क्रीडा

फर्नांडो टोरेसच्या डोक्‍याला दुखापत 

पीटीआय

माद्रिद - ऍटलेटिको माद्रिदचा अव्वल आक्रमक फर्नांडो टोरेस याला ला लिगा या स्पॅनिश फुटबॉल साखळीतील लढतीत खेळताना डोक्‍याला जबर दुखापत झाली; पण त्याच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नसल्याने त्याला तपासणीनंतर हॉस्पिटलमधून पाठवण्यात आले आहे. 

ऍटलेटिको आणि देपोर्तोवा लढत 1-1 बरोबरीत होती. लढतीतील शेवटची पाच मिनिटे शिल्लक होती. त्या वेळी हवेतून आलेल्या चेंडूवर ताबा घेण्यासाठी टोरेस सरसावला; पण पाठीमागून येणाऱ्या देपोर्तोवाच्या ऍलेक्‍स बेर्गतिनोस याचा त्याला धक्का लागला आणि तो खाली पडला. तो बेशुद्ध होता. मैदानावरच त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र लगेचच त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. 

ऍटलेटिकोने या दुर्घटनेपूर्वीच तीन खेळाडू बदलले होते, त्यामुळे त्यांना अखेरची काही मिनिटे दहा खेळाडूंविनाच खेळावे लागले; मात्र निकाल बदलला नाही. ऍटलेटिकोचे खेळाडू या वेळी केवळ सामना संपण्याची औपचारिकता पूर्ण करीत होते.

टोरेसचा सहकारी जोस मारिया गिमेनेझ याला तर अश्रू आवरत नव्हते. काय होणार याची आम्हाला सर्वांना धास्ती वाटत आहे, असे ऍटलेटिकोचे लेफ्ट बॅक फिलीप लुईस याने सांगितले. 

टोरेसच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात आले. त्याला कोणतीही गंभीर दुखापत नाही. त्याला 48 तास विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असे ऍटलेटिको संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. टोरेसने सर्वांचे आभार मानले आहेत, तसेच आपण केवळ घाबरलो होतो, असे त्याने सांगितल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT