FIFA World Cup 2022 Argentina Vs Mexico sakal
क्रीडा

FIFA - Argentina Vs Mexico : लिओनेल मेस्सीची प्रतिष्ठा पणास, आज मेक्सिकोशी सामना

मेस्सीच्या अर्जेंटिनावर विश्वकरंडकातील आव्हान कायम राखण्याचे संकट

सकाळ ऑनलाईन टीम

FIFA World Cup 2022 Argentina Vs Mexico : नव्या पिढीचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची प्रतिष्ठा पणास लागली आहे. मेस्सीच्या अर्जेंटिनावर विश्वकरंडकातील आव्हान कायम राखण्याचे संकट आहे. सौदी अरेबिया संघाकडून सलामीच्या लढतीत पराभूत झाल्यामुळे अर्जेंटिना संघाला उद्याच्या लढतीत पराभवापासून दूर रहावे लागणार आहे. मेक्सिकोकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यास त्यांचे या स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात येईल. या वेळी मेस्सीच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागेल. 'क' गटातील महत्त्वाची लढत आज होणार आहे.

ला लीगा करंडक १० वेळा, चॅम्पियन्स लीग ४ वेळा आणि कोपा अमेरिका एक वेळा जिंकणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या मेस्सी याने सात वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कारही पटकावला आहे. फुटबॉल विश्वातील स्वप्नवत जीवन त्याने जगले आहे. मात्र एका करंडकाने त्याला सातत्याने हुलकावणी दिली आहे. विश्वकरंडक त्याच्यापासून दूरच राहिला आहे.

कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मेस्सीचा कतारमधील विश्वकरंडक हा अखेरचा असेल. ही स्पर्धा जिंकून स्वप्नतृप्तीने फुटबॉलला अलविदा करण्याचा ध्यास त्याने बाळगला असेल. सौदी बाद फेरीत ? सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का देत महत्त्वाचे तीन गुण मिळवले. आता त्यांना अंतिम १६ फेरीमध्ये धडक मारण्याची सुवर्णसंधी आहे. पोलंडविरुद्धच्या लढतीत विजय मिळाल्यास ते आगेकूच करतील.

  • अर्जेंटिनाने १९७८ व १९८६ या दोन वर्षांमध्ये विश्वकरंडक जिंकण्याची किमया.

  • १९३०, १९९० व २०१४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान.

  • अर्जेंटिनाचा संघ याआधी २००२ मधील विश्वकरंडकात साखळीत गारद.

'क' गटातील आजच्या लढती

  • पोलंड - सौदी अरेबिया, अल रयान | संध्याकाळी ६.३० वाजता

  • अर्जेंटिना - मेक्सिको, लुसेल । मध्यरात्री १२.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT