FIFA World Cup 2022  esakal
क्रीडा

fifa world cup 2022 : डावपेंचाची सरशी कमनशिबी कौशल्य

आक्रमक खेळाचा बादशहा ब्राझीलला टायब्रेकरमध्ये नमवून उपांत्य फेरी गाठली

दीपक कुपन्नावर

रोमहर्षक लढतीत क्रोएशियाने डावपेंचांच्या जोरावर आक्रमक खेळाचा बादशहा ब्राझीलला टायब्रेकरमध्ये नमवून उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे कौशल्यपुर्ण अलौकिक खेळाडूंचा भरणा असूनही ब्राझील कमनशिबी ठरला. तब्बल १२० मिनिटात क्रोएशियाचा बचाव अनेकदा भेदूनही गोलरक्षक लिव्हाकोईकच्या चिवट गोलरक्षणामुळे ब्राझीलला भक्कम आघाडी घेता आली नाही.

ज्यादा वेळेच्या उत्तरार्धात नेमारच्या माध्यमातून मिळालेली आघाडीही शेवटच्या मोजक्या वेळेत गाफीलपणाने गमावली. तुलनेत क्रोएशियाने निर्धारित वेळेत आपल्या गोलजाळीसमोर अकरा खेळाडूंची तटबंदी करत ब्राझीलला गोलविना तडपविले. ''थंडा करके खाओ'' या धोरणाने संथ ''बिल्डअप'' करत ब्राझीलच्या आक्रमणाला वेसन घालत सामना ज्यादा वेळेत पोहचविला. मुख्यतः क्रोएशियाचा ३७ वर्षीय प्लेमेकर लुका मॉड्रीच तर अठरा वर्षाच्या तरुणांप्रमाणे अथक धावत बचाव ते आक्रमण फळीत चौफेर खेळ करीत होता. त्याव्दारे त्याने अजूनही आपणच हुकमी एक्का असल्याचे अधोरेखित केले. ज्यादा वेळेत गोलची परतफेड केल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या अनुभवी क्रोएशियाने टायब्रेकरमध्ये अचूक फटके मारत ब्राझीलला चारीमुंड्या चित केले.

गोलरक्षक लिव्हाकोईक लागोपाठ दुसऱ्या सामन्यात तारणहार ठरला. त्यामुळे ब्राझीलचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न उपांत्यपूर्व फेरीतच उध्वस्त झाले.

''अंडरडॉग्स'' मोरोक्को

''भक्कम बचाव हेच आक्रमण’या धोरणाने खेळणाऱ्या मोरोक्को हा स्पर्धेतील ‘अंडरडॉग्ज’ आहे. या संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही. माजी विजेता स्पने, बेल्जियम या अव्वल संघाना गारद करत मोरोक्कोची वाटचाल धडकी भरवणारी आहे. बचावपटू हकिमी, गोलरक्षक बाऊनउ हे संघाचे अस्त्र आहेत. नव्या पिढीचा दिग्गज स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला बाकावर बसवून हॅटट्रीक साधणारा रामोस की पुन्हा ख्रिस्तीयानो हे कोड प्रशिक्षक सांतोस यांना सोडवावे लागेल. दक्षिण कोरियाने जमिनीवर आणल्यावर घाणा, उरुग्वे, स्वित्झर्लंडचा फडशा पाडत पोर्तुगालने यशोमालिका गुंफली आहे.

ब्रुनो फर्नाडिस, कॅन्सिलो, सिल्वा यांच्यावरच संघाचे यशापयश अवलबूंन आहे. यामुळे उपांत्य फेरीत पोहचून आफ्रिकन वाघ मोरोक्को इतिहास घडविणार कि युरोपियन पोर्तुगालची मक्तेदारी कायम राहणार हे पाहणे उद्या (ता. १०) उत्कंठावर्धक आहे.

''रॉयल'' मुकाबला

विलक्षण फॉर्ममध्ये असणाऱ्या इंग्लंडने इराण, वेल्स, सेनेगलचा पाडाव करीत आगेकूच केली आहे. प्रशिक्षक साऊथगेट यांच्या ‘थ्री लासन्स’ने स्पर्धेत ४-३-३ या फॉर्मेशनने खेळत सर्वाधिक बारा गोल करत दबदबा निर्माण केला आहे. अनुभवी हॅरी केन, रँशफोर्ड, जॉन स्टोन्स, ज्युदे बेलिंगहॅम हे आघाडी फळीत सुरेख खेळत आहेत. दुबळ्या इराणकडून निष्काळजीपणाचे दोन गोल वगळता बचावफळीनेही चांगली कामगिरी केली आहे. पलिकडे प्रतिस्पर्धी गतविजेत्या फ्रान्सने ऑस्ट्रेलिया, पोलंड, डेन्मार्कला हरवित घौडदौड केली आहे.

बाद फेरीत प्रवेश निश्चित होताच राखीव खेळाडूंना मैदानात धाडणाऱ्या प्रशिक्षक देशचॅम्प यांना नवोदित ट्यूनिशियाने झटका दिला. गोल्डन बुटचा दावेदार किलियन एम्बापे विलक्षण वेग आणि चपळ हालचालीव्दारे पाच गोल नोंदवित तुफान कामगिरी करीत आहे. टचाऊमेनी, ग्रीझमन, राबीओट हे संघाची ताकद आहेत. सामन्यात खेळाडूबरोबरच प्रशिक्षकाचीं सरस तांत्रिक डावपेचासाठी कसोटी लागणार आहे. माजी विजेत्या इग्लंड आणि फ्रान्स यांनी सर्वच स्तरावर बहारदार कामगिरी करून दिमाखात उपात्यंफेरी गाठली आहे.

त्यामुळे या दोघातील सामना झुंज, आव्हान, प्रतिआव्हान असा रंगणार आहे. स्पर्धेतील या अव्वल संघातील ‘रॉयल’ मुकाबल्याकडे तमाम फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून आहे. तब्बल सहा वेळा उपांत्यपूर्व फेरीत गारठणारा इंग्लंड इतिहास पुसणार की सलग विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी फ्रान्स मुसंडी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Oppo Reno 14 Launch : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Oppo Reno 14 सिरीज; 50MP कॅमेरे, 1TB स्टोरेजसह AI फिचर्स अन् किंमत फक्त..

Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश

Crime News: हातगाडीला धडक दिल्याने युवकाला बेदम मारुन ठार केलं; शहरात जातीय तणाव

Imtiaz Jaleel : पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास इम्तियाज जलील यांचा नकार

SCROLL FOR NEXT