FIFA World Cup 2022 Countdown Sakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 Countdown : क्रोएशिया-बेल्जियम काँटे की टक्कर

या गटात गत स्पर्धेत मोठी मजल मारणारे बेल्जियम आणि क्रोएशिया हे दोन संघ आहेत

सकाळ वृत्तसेवा

‘फ’ गटात चांगली चुरस पाहायला मिळणार आहे. या गटात गत स्पर्धेत मोठी मजल मारणारे बेल्जियम आणि क्रोएशिया हे दोन संघ आहेत. क्रोएशिया उपविजेते आहेत, तर बेल्जियमने तिसरा क्रमांक मिळवला होता.

बेल्जियम : रँकिंग : २

गेल्या दोन स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा संघ, मात्र गेल्या दोन स्पर्धांतील खेळाडू आत्ताच्या संघात नाहीत. असे असले तरी गटात अव्वल स्थान मिळवण्याची शक्यता. केविन डी ब्रुयन आणि लुमामी लुकाकू प्रमुख खेळाडू. यंदाच्या क्लब फुटबॉल मोसमात लिओनेल मेस्सीनंतर सर्वाधिक यशस्वी पास देणारा खेळाडू डी ब्रुयन आहे. हाच फॉर्म कायम असला तर लुकाकूला गोल करण्याची अधिक संधी.

क्रोएशिया : रँकिंग : १२

क्रोएशिया आणि बेल्जियम यांच्यातील लढत ग्रुप लिडर ठरवणार असली तरी क्रोएशियाला अधिक शर्थ करावी लागणार. गत स्पर्धा लुका मॉड्रिकने गाजवली होती. गोल्डन बॉल हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही त्याने मिळवला होता, परंतु यंदा सातत्य राखण्याचे आव्हान.

मोरोक्को : रँकिंग : २२

मोरोक्कोसाठी कतार हे ठिकाण लाभदायी ठरले नाही. मागच्या वेळी येथे झालेल्या अरब कप स्पर्धेत मोरोक्कोचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. आता बेल्जियम आणि क्रोएशिया असे संघ असल्यामुळे बाद फेरी गाठण्याची शक्यता कमी.

कॅनडा : रँकिंग : ४१

कॅनडाचा संघ १९८६ नंतर प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कतारमधील परिस्थितीशी ते कसे जुळवून घेतात हे महत्त्वाचे. पात्रता स्पर्धेत २३ गोल करताना सातच गोल स्वीकारले ही जमेची बाजू; परंतु गटामध्ये बेल्जियम आणि क्रोएशिया या मात्तबर संघांसमोर बचाव खेळाचा कस लागणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT