Croatia Got Third Place Won over 225 crore Rupees esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : मोरोक्कोने सामना गमावून देखील कमावले 205 कोटी, क्रोएशियालाही मिळाली मोठी रक्कम

अनिरुद्ध संकपाळ

Croatia Got Third Place Won over 225 crore Rupees : क्रोएशियाने फिफा वर्ल्डकपची सेमी फायनल पहिल्यांदा गाठलेल्या मोरोक्कोचा थर्ड प्लेसच्या सामन्यात 2 - 1 असा पराभव केला. क्रोएशियाला फिफा वर्ल्डकपमध्ये थर्ड प्लेसबरोबर बक्कळ पैसा देखील मिळाला आहे. क्रोएशियाला तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल फिफाकडून 25 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 225 कोटी रूपये मिळाले आहेत. तर फिफा वर्ल्डकपच्या इतिहासातील पहिला थर्ड प्लेस जिंकणारा आफ्रिकी देश ठरता ठरता राहिलेल्या मोरोक्कोला देखील मोठी रक्कम मिळाली आहे. त्यांना फिफाकडून 205 कोटी रूपये मिळाले आहेत.

मोरोक्कोने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. फिफा वर्ल्डकप इतिहासात सेमी फायनल गाठणारा मोरोक्को हा आफ्रिका खंडातील पहिपा देश ठरला होता. त्यांना थर्ड प्लेसचा सामना जिंकून इतिहास रचण्याची आजच्या सामन्यात संधी होती. मात्र क्रोएशियाने त्यांचे स्वप्न तोडले. फ्रान्सने मोरोक्कोचा सेमी फायनलमध्ये 2 - 1 असा पराभव केला. तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3 - 0 असा पराभव केला होता.

क्रोएशियाच्या जोस्को ग्वारदिओलने 7 व्या मिनिटाला मोरोक्कोची गोलपोस्ट भेदली. क्रोएशियाने सामन्याची 10 मिनिटे देखील पूर्ण झाली नव्हती त्यावेळी 1 - 0 अशी आघाडी घेतली. मोरोक्कोच्या अचरफ दारीने 9 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या गोलची परतफेड करत 1 - 1 अशी बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलपोस्टवर चढाया सुरू केला. अखेर पहिला हाफ संपायला अवघी दोन मिनिट शिल्लक असताना क्रोएशियाच्या मिसाव्ह ओसरिचने 42 व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला 2 - 1 अशी आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

SCROLL FOR NEXT