कायलियन एम्बापेच्या sakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 :गतविजेत्या फ्रान्सचे गटात अव्वल स्थान कायम ठेवण्याचे लक्ष्य

ट्युनिशियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेले

सकाळ वृत्तसेवा

कतार : सलग दोन सामने जिंकून गतविजेत्या फ्रान्सचा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीतील प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे उद्या ट्युनिशियाविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सराव लढतीसारखाच असेल. ट्युनिशियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेले असल्यामुळे उद्याच्या सामन्यातून एक तरी विजय पदरी पाडण्यासाठी त्यांचा लढा असेल.

विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी फ्रान्सचे काही प्रमुख खेळाडू जखमी झाल्यामुळे पर्यायी खेळाडूंची मोट बांधून त्यांनी सुरुवात केली. कायलियन एम्बापेच्या शानदार खेळाच्या जोरावर त्यांना बाद फेरी अगोदरच निश्चित करण्यात अडचणी आल्या नाहीत.

उद्याच्या सामन्यात एम्बापेला कदाचित विश्रांती दिली जाऊ शकते किंवा मध्यांतरानंतर राखीव खेळाडूही केले जाऊ शकते.

फ्रान्सचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झालेला असला, तरी गटात अव्वल स्थान कायम ठेवण्यावर त्यांचा भर असेल. यासाठी उद्याच्या सामन्यात त्यांना बरोबरीही पुरेशी आहे.

ऑस्ट्रेलियाला संधी

या गटात ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ही लढत बाद फेरीचा दुसरा संघ निश्चित करणारी असेल. ऑस्ट्रेलियाने दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवलेला आहे; तर डेन्मार्कची परिस्थिती एक पराभव एक बरोबरी अशी आहे. त्यामुळे बाद फेरीसाठी त्यांना विजय आवश्यकच आहे. बरोबरीही त्यांना पुरेशी ठरणार नाही.

दृष्टिक्षेपात

ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क यांच्या विश्वकरंडक स्पर्धेक एकच लढत; मात्र ती बरोबरीत

या दोन संघांत एकूण चार आंतरराष्ट्रीय सामने. त्यात डेन्मार्कचे दोन; तर ऑस्ट्रेलियाचा एक विजय

ऑस्ट्रेलिया विश्वकरंडक स्पर्धेत प्रथमच सलग दोन सामने जिंकण्यासाठी प्रयत्नशील

एरिक्सनवर सर्वांचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT