FIFA World Cup 2022 Esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022: इंग्लंडच्या संघाला फिफाची धमकी! 'या' कारणामुळे होणार मोठी कारवाई

कतारमध्ये खेळविण्यात येणारी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा अनेक वादविवादांनी घेरली

सकाळ डिजिटल टीम

कतारमध्ये खेळविण्यात येणारी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा अनेक वादविवादांनी घेरली आहे. त्यातच इंग्लंडच्या खेळाडूंनी जर सामन्याअगोदर समलैंगिकांना पाठिंबा दर्शविणारे आर्मबँड घातले, तर त्यांना पिवळे कार्ड दाखवले जाईल किंवा त्यांच्यावर काही सामन्यांची बंदी घालण्यात येईल अशी धमकीच फिफाने इंग्लंडच्या फुटबॉल संघटनेला दिली आहे.

इंग्लिश फुटबॉल संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क बुलिंगहॅम म्हणाले की ,‘समलैंगिक लोकांना पाठिंबा दर्शविणारे आर्मबँड खेळाडूंनी घातले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी देणे म्हणजे संपूर्ण मानवतेच्या विरोधातच जाण्यासारखे आहे. कतारमध्ये समलैंगिक लोकांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. याचा निषेध करण्यासाठी वेल्स, बेल्जियम, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि आमच्या देशातील खेळाडूंनी हे आर्मबँड घालण्याचे ठरवले होते. आमचा हा निर्णय आम्ही फिफाच्या अधिकाऱ्यांना कळवला होता.

मात्र त्यांची काहीच प्रतिक्रिया आली नाही. आम्ही या विषयावर फिफाशी काही बैठकासुद्धा घेतल्या. नंतर अमेरिकाविरुद्धच्या सामन्याअगोदर आम्ही हा बँड घालणार असल्याचे ठरवले होते. आम्हाला याकरिता फिफाकडून परवानगी मिळाली नव्हती; परंतु सामन्याच्या दोन तास आगोदर त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला समलैंगिकांना पाठिंबा दर्शविणारा बँड घातल्यास कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT