FIFA World Cup 2022  esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : युरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती

उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाशी लढत

सकाळ वृत्तसेवा

अल रयान (कतार) : फिफा विश्‍वकरंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना उद्यापासून सुरुवात होणार आहे. फिफा क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ब्राझीलसमोर बाराव्या स्थानावरील क्रोएशियाचे आव्हान असणार आहे. क्रमवारी व सध्याचा फॉर्म बघता या लढतीत ब्राझीलचे पारडे जड आहे, असे म्हटले जात असले तरी मागील चार विश्‍वकरंडकांत (२००६, २०१०, २०१४ व २०१८) युरोपियन देशांकडून पराभूत झाल्यामुळे ब्राझीलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे युरोप खंडातील क्रोएशियासमोर ब्राझीलचा संघ निष्काळजी खेळ करील असे वाटत नाही.

२००६ मधील विश्‍वकरंडकात फ्रान्सने ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते. त्यानंतर २०१० विश्‍वकरंडकात नेदरलँडस्‌ संघाने ब्राझीलवर उपांत्यपूर्व फेरीत २-१ असा विजय साकारला होता. २०१४ मधील विश्‍वकरंडकात जर्मनीने ब्राझीलचा उपांत्य फेरीच्या लढतीत ७-१ असा धुव्वा उडवला. मागील २०१८ मधील विश्‍वकरंडकात बेल्जियमकडून ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत २-१ असा पराभवा पत्करावा लागला होता. यंदाही ब्राझीलसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युरोपीय देशाचे आव्हान असणार आहे. ब्राझीलचा संघ क्रोएशियाचे आव्हान कशाप्रकारे परतवून लावतो हे पाहणे रंजक ठरेल.

ब्राझीलचेच वर्चस्व

ब्राझील - क्रोएशिया यांच्यामध्ये २००६ व २०१४ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडकातील लढतींमध्ये ब्राझीलचेच वर्चस्व राहिले आहे. २००६ मधील विश्‍वकरंडकातील लढतीत ब्राझीलने क्रोएशियावर १-० असा विजय संपादन केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ब्राझीलने क्रोएशियाला ३-१ असे पराभूत केले होते.

जेतेपदाचे लक्ष्य : नेमार

दुखापतीमधून बरा होत उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पुनरागमन करणारा नेमार याप्रसंगी म्हणाला, यंदाच्या स्पर्धेतील चार लढती पूर्ण झाल्या आहेत. आता जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी आणखी तीन लढतींमध्ये विजय आवश्‍यक आहे. आमच्या संघातील खेळाडूंनी जेतेपदाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT