क्रीडा

FIFA WC22 : आता उपांत्य फेरीचा थरार! तीन खंडातील देशांमध्ये फायनलसाठी चुरस

Kiran Mahanavar

FIFA World Cup 2022 : फिफा विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीच्या लढतींचा थरार आता रंगणार आहे. अर्जेंटिना - क्रोएशिया व फ्रान्स - मोरोक्को यांच्यामध्ये उपांत्य फेरी होणार आहेत. फ्रान्स व क्रोएशिया हे युरोप खंडातील, अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेतील आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातील देश उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

क्रोएशिया संघाने सलग दुसऱ्यांदा विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी क्रोएशियाला १९९८मध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. २०१८मध्ये हा संघ उपविजेता ठरला.

फ्रान्स संघाने १९९८ मध्ये पहिल्यांदा विश्‍वकरंडक पटकावला होता. त्यानंतर २०१८ मध्ये रशिया येथे झालेल्या विश्‍वकरंडकात त्याने दुसऱ्यांदा यश मिळवले. आता फ्रान्सचा संघ विश्‍वकरंडक तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. तसेच सलग दुसऱ्यांदा विश्‍वकरंडक जेतेपदावर मोहोर उमटवून इटली व ब्राझील यांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठीही त्यांचा संघ अतोनात प्रयत्न करील.

मोरोक्को हा आफ्रिका खंडातील देश. या संघाने पोर्तुगालला हरवत विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली आहे. कोणत्याही आफ्रिकन खंडातील देशाला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी याआधीच इतिहास रचला आहे. आता अंतिम फेरीत पोहोचण्याचे ध्येय त्यांचे असेल.

मेस्सीचे स्वप्न

अर्जेंटिनाने दोन वेळा विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया साधली आहे; पण १९८६नंतर त्यांना एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. लिओनेल मेस्सीलाही विश्‍वकरंडक जिंकून देता आलेला नाही. हेच स्वप्न त्याने बघितले आहे. याप्रसंगी मेस्सीचे स्वप्न पूर्ण होते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते -पंतप्रधान मोदी

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT