क्रीडा

FIFA World Cup 2022 : पोलंडविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड

उद्या त्यांच्यात एकूण १६ वा सामना होत आहे आणि विश्वकरंडक स्पर्धेतला दुसराच

सकाळ वृत्तसेवा

दोहा : दुखापतीमुळे काही प्रमुख खेळाडू नसले, तरी संभाव्य विजेत्यांमध्ये आघाडीवर असलेल्या गतविजेत्या फ्रान्सचा उद्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पोलंडविरुद्ध सामना होत आहे. फ्रान्सची कामगिरी पाहता त्यांचे पारडे जड आहे.पहिल्या दोन सामन्यांत शानदार विजय मिळवून बाद फेरी अगोदरच निश्चित झाल्यामुळे फ्रान्सने अखेरच्या साखळी सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे ट्युनिशियाविरुद्ध त्यांचा पराभव झाला, परंतु त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमजोर झालेला नाही. उद्या पोलंडविरुद्ध ते गतविजेते हा टॅक कायम ठेवून मैदानात उतरतील. फ्रान्स आणि पोलंड एकाच खंडातून खेळतात, त्यामुळे त्यांच्यात वारंवार सामने होत असतात. त्यात फारसा अपवाद मात्र विश्वकरंडक स्पर्धेचा असतो. उद्या त्यांच्यात एकूण १६ वा सामना होत आहे आणि विश्वकरंडक स्पर्धेतला दुसराच.

१९८२ च्या विश्वकरंडक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पोलंडने फ्रान्सचा पराभव केला होता.या दोन संघांतून झेबीनिव बोनेक आणि ग्रिगोर्झ लाटो या पोलंडच्या; तर फ्रान्सकडून मिशेल प्लॅटिनी, मारिओस ट्रेझोर अशा खेळाडूंनी अगोदरचे द्वंद गाजवलेले आहे. या वेळी कायलियन एम्बापे आणि रॉब्रेट लेवांडोवस्की यांच्यातील लढत महत्त्वाची ठरणार आहे. पोलंडची मदार अर्थातच लेवांडोवस्कीवर असणार आहे. अर्जेंटिनाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात त्याला अजिबात प्रभाव पाडता आला नव्हता. अर्जेंटिनाच्या आक्रमक खेळाडूंनी चेंडू पोलंडच्या अर्धातच अधिक काळ ठेवल्यामुळे लेवांडोवस्कीला गोल करण्याच्या संधीच मिळाल्या नव्हत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन पकडलं, अमित शहांची माहिती

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT