Japan  sakal
क्रीडा

fifa world cup 2022 : जपानचा स्पेनवर सनसनाटी विजय

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज जोरदार उलटफेर झाला

सकाळ वृत्तसेवा

कतार : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज जोरदार उलटफेर झाला. जपानने बलाढ्य स्पेनचा २ विरुद्ध १ गोलने पराभव करून धक्कादायक विजय नोंदवला. जपानच्या विजयानंतर स्टेडियमवरील जपानच्या चाहत्यांनी केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. या पराभवामुळे स्पेनच्या पाठीराख्यांना मोठाच झक्का बसला. जपानविरुद्ध मैदानात उतरलेला स्पेन हा सामना सहज जिंकणार असाच होरा होता, त्यामुळे स्पेनने आपले अव्वल खेळाडू मागे ठेवले; मात्र जपानने २ गोल केल्यानंतर स्पेनचा संघ जागा झाला; मात्र त्यांना जपानला नमवता आले नाही.

सामन्याच्या प्रारंभापासूनच स्पेनने जोरदार आक्रमणे केली आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोल केला. अल्वारो मोराटाने मारलेला फटका थेट गोलजाळीत विसावला. त्यानंतर स्पेनच्या खेळामध्ये शैथिल्य आले, तर जपानने मात्र इर्ष्येने खेळ केला आणि स्पेनवर सातत्याने आक्रमणे केली. जपानच्या रित्शु डोआन याने ४८ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. या धक्क्यातून स्पेन सावरतो न सावरतो तोच तीन मिनिटांनंतर ५१ व्या मिनिटास आवो तानाका याने गोल केला आणि जपानला विजयी आघाडी मिळवून दिली. या धक्क्यानंतर खडबडून जागे झालेल्या स्पेनने प्रतिआक्रमणे रचली; मात्र त्यांना गोल बरोबरी साधता आली नाही

आणि जपानने स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT