FIFA World Cup 2022 esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम लांबणीवर

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाची सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अवघ्या काही दिवसांवर आलेला कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम लांबणीवर पडला आहे. २०२२ - २३ साठीच्या फुटबॉल हंगामाबाबत सुपर सिनियर ८ व सिनियर ८ संघाचे पदाधिकारी व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन पदाधिकरी यांच्यामध्ये बैठक झाली.

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाची सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत. अशातच परदेशी खेळाडू व देशातील नामवंत खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये आपली चुणूक दाखवणार आहेत. यामुळे नेमका हंगाम कधी सुरु होणार, याकडे फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच केएसएकडून चार डिसेंबरपासून फुटबॉल हंगाम सुरु होणार असल्याचे पत्रक जारी करण्यात आले. मैदान खेळण्यायोग्य करण्याची तयारी देखील सुरु झाली; मात्र आज अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ संघांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विद्यापीठस्तरीय विभागीय व आंतरविभागीय स्पर्धा मिरज येथे होत आहेत. यासाठी काही खेळाडू सहभागी होत आहेत.

यामुळे यंदाचा कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाची तारीख बदलण्याचा निर्णय चर्चेनंतर घेण्यात आला आहे. हंगाम १० डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचे प्राथमिक स्तरावर ठरले आहे. या निर्णयामुळे लाखो रुपये गुंतवलेल्या संघ व्यवस्थापनाला पुढील नियोजनाचा प्रश्न पडला आहे. त्याचवेळी फुटबॉल प्रेमींना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे काही सामने होणार आहेत. यासाठी ७ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मैदान राखीव ठेवावे लागणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा होत असल्याने यासाठीचे नेटके नियोजन देखील करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

के. एस. ए. लीग सुरु झाल्यापासून अंतिम सामन्यासाठी किमान ४० दिवस लागतात; मात्र हंगाम उशिरा सुरु झाल्याने विविध तांत्रिक कारणामुळे लीग स्पर्धाना मोठा हाफ टाइम घ्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT