Lionel Messi sakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाच्या विजयात लिओनेल मेस्सी चमकला

फिफा विश्‍वकरंडक सराव सामना

सकाळ वृत्तसेवा

अबुधाबी : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना फुटबॉल संघाची कतारमधील फिफा विश्‍वकरंडकाची सुरुवात दमदार झाली आहे. अर्जेंटिनाने सराव लढतीत संयुक्त अरब अमिरातीचा ५-० असा धुव्वा उडवला आणि मुख्य फेरीच्या लढतींआधी आत्मविश्‍वास कमवला. या लढतीत मेस्सीच्या खेळाकडेच सर्वांचे लक्ष होते. ज्युलियन अल्वारेझ याने १७व्या मिनिटाला गोल केला. या गोलमध्ये मेस्सीचे सहकार्य लाभले. त्यानंतर एंजेल दी मारीया याने २५व्या व ३६व्या मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनाला ३-० असे पुढे नेले. पूर्वार्धाच्या एक मिनीट आधी मेस्सीने स्वत:चा पहिला गोल केला.

त्यामुळे अर्जेंटिनाकडे पूर्वार्धातच ४-० अशी आघाडी होती. इंटर मिलानचा फॉरवर्ड खेळाडू जोकीन कोरिया याने ६०व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी पाचवा व अखेरचा गोल केला. अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी हाफ टाईमनंतर संघात चार बदल केले; पण मेस्सीला त्यांनी विश्रांती दिली नाही. तो ९० मिनिटे मैदानावर होता, हे विशेष.

निकलसमुळे जर्मनी वाचली

चार वेळा विश्‍वविजेता ठरलेल्या जर्मनीने सराव लढतीत ओमानवर १-० असा विजय संपादन केला. जर्मनीला या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. निकलस फुल्करग या पहिला सामना खेळणाऱ्या खेळाडूने एकमेव गोल केला. त्याने ८०व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे संघाला ओमानवर विजय मिळवता आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT