football Lionel Messi Argentina  sakal
क्रीडा

fifa world cup 2022 : मेस्सी आणि अर्जेंटिनासाठी आता आर या पार!

बाद फेरीत आज ऑस्ट्रेलियाशी दोन हात

सकाळ वृत्तसेवा

अल रयान (कतार) : अर्जेंटिनाचा महान फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. कतार येथे सुरू असलेली विश्‍वकरंडक स्पर्धा ही त्याची अखेरची असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अर्जेंटिनाचा संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या बाद फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. एका लढतीतील पराभव हा अर्जेटिना आणि मेस्सीसाठी वेदनादायक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक लढतीमध्ये अर्जेंटिनाला सर्वस्व पणाला लावावेच लागणार आहे. मेस्सीच्या फुटबॉल कारकीर्दीतील शेवट कसा होतोय, हे येणारा काळच ठरवणार आहे.

आशिया खंडातील देश सौदी अरेबियाने सलामीच्या लढतीत बलाढ्य अर्जेंटिनाला २-१ असा पराभवाचा धक्का दिला. या पराभवामधून सावरत अर्जेंटिनाने पुढील दोन लढतींमध्ये मेक्सिको व पोलंड या देशांना पराभूत केले आणि बाद फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या फ्रान्सने ऑस्ट्रेलियावर ४-१ असा दणदणीत विजय साकारला होता. ऑस्ट्रेलियाने या पराभवाला मागे सारत पुढील दोन लढतींमध्ये अर्जेंटिनाप्रमाणेच विजय साकारले व पुढे पाऊल टाकले. ऑस्ट्रेलियाने ट्युनिशिया व डेन्मार्क या दोन्ही देशांना पराभूत केले.

अमेरिकेसमोर नेदरलँडचे आव्हान

अल रयान (कतार), ता. २ ः तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या नेदरलँड संघाला उद्या फिफा विश्‍वकरंडकातील अंतिम १६ फेरीच्या लढतीत (उपउपांत्यपूर्व) अमेरिकेशी दोन हात करावे लागणार आहेत. यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता नेदरलँड्स‌ संघाकडे या लढतीतील विजेता म्हणून बघितले जात असले तरी बलाढ्य संघांना पराभवाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे अमेरिकन फुटबॉल संघाला कमी लेखून याप्रसंगी चालणार नाही.

दृष्टिक्षेपात

अर्जेंटिना संघाने मागील १२ पैकी ११ विश्‍वकरंडकात बाद फेरी गाठली आहे.

अर्जेंटिनाने २००६ व २०१० मधील विश्‍वकरंडकात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली होती.

२०१४ विश्‍वकरंडकात उपविजेत्या राहिलेल्या अर्जेंटिनाला २०१८ मधील स्पर्धेमध्ये अंतिम १६ फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

टोकियो ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला हरवण्याची किमया साधली आहे. (दोन्ही संघांतील खेळाडू भिन्न होते)

ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम १६ फेरीचा अडथळा एकदाही ओलांडता आलेला नाही.

ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला पराभूत केल्यास त्यांचा संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे.

आजच्या उपउपांत्यपूर्व लढती : अर्जेंटिना - ऑस्ट्रेलिया |

अल रयान | मध्यरात्री १२.३० वाजता

नेदरलँड - अमेरिका | अल रयान | रात्री ८.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलचं T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान न मिळण्यावर मोठं विधान; म्हणाला, निवड समितीने...

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण; छाननी समिती कशासाठी?

Nashik News : तुमच्या खिशातील चिल्लर तुम्हाला बनवू शकते लखपती? नाशिकमध्ये नाणी-नोटांच्या खरेदी-विक्रीची धूम

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

Navi Mumbai: उमेदवार बदलल्यामुळे प्रचारात भाजपचा गोंधळ, बाद झालेल्या उमेदवाराला कोर्टाने दिली परवानगी

SCROLL FOR NEXT