FIFA World Cup 2022 sakal
क्रीडा

fifa world cup 2022 : अर्जेंटिनासमोर आज नेदरलँडचे आव्हान

मेस्सीची सेना सज्ज

सकाळ वृत्तसेवा

लुसैल : दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. शिवाय अर्जेंटिनाने १९८६ नंतर विश्‍वकरंडकही जिंकलेला नाही. त्यामुळे मेस्सीला निरोप देण्याआधी अर्जेंटिनाचा संघ विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाचा दुष्काळ संपावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. अर्जेंटिना व जेतेपद आता फक्त तीन पावले दूर आहे. अर्जेंटिनाला उद्या होत असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नेदलॅंडशी दोन हात करावे लागणार आहेत. अर्जेंटिनाचा संघ सहाव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

मेस्सी सदस्य असलेल्या संघाने चॅम्पियन्स लीग, ऑलिंपिक, कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. जगातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याने पटकावला आहे; पण विश्‍वकरंडकाच्या जेतेपदापासून मेस्सी सातत्याने दूर राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघाने २०१४ मध्ये विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; पण जर्मनीकडून हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

नेदलॅंड संघाला मात्र या स्पर्धेच्या जेतेपदावर अद्याप मोहोर उमटवता आलेली नाही. नेदरलँड्‌स संघाला १९७४, १९७८ व २०१० मध्ये उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. त्यांनी १९९८ मधील विश्‍वकरंडकात चौथे स्थान, तर २०१४ मधील विश्‍वकरंडकात तिसरे स्थान पटकावले होते. त्यांना २०१० मध्ये स्पेनविरूद्ध अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

लिओच्या आजूबाजूला खेळ रंगतो

लिओ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मेस्सीच्या आजूबाजूला अर्जेंटिनाचा खेळ रंगतो. या संघातील सर्व खेळाडू मेस्सीच्या अवतीभवती खेळाच्या योजना अंमलात आणत आहेत. मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनीच तशी योजना आखली आहे.

मेस्सीने या संघाकडून सर्वाधिक तीन गोल केले असून; एका गोलला सहाय्यही केले आहे. मेस्सीने तब्बल १९ वेळा गोलसाठी टार्गेट केले आहे. एवढेच नव्हे, तर मधली फळी व बचाव फळीतील दुवाही तोच आहे.

लिओनेल मेस्सीसह रॉड्रिगो दी पॉल, अँजेल दी मारीया या खेळाडूंनीही अर्जेंटिनाच्या विजयात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.

इतिहास दोन्ही संघांच्या बाजूने

अर्जेंटिना - नेदरलॅंड यांच्यामध्ये विश्‍वकरंडकामध्ये नऊ लढती पार पडल्या आहेत. दोन देशांमधील पाच लढती बरोबरीत राहिल्या आहेत. तसेच दोन देशांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन लढती जिंकल्या आहेत.

नेदरलॅंडचा तारणहार कॉडी गॅक्पो

नेदरलॅंड संघासाठी कॉडी गॅक्पो याने शानदार कामगिरी केली आहे. तो नेदरलॅंड संघाचा तारणहार ठरला आहे. त्याने तीन गोल केले आहेत. सर्वाधिक २४ क्रॉसही त्याच्याकडूनच झाले आहेत. मधल्या तसेच बचाव फळीचा दुवा म्हणूनही त्याने ठसा उमटवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs DC Live: दिल्लीच्या १५ धावांत ४ विकेट्स! सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल, गुरजपनीतचा पहिल्याच चेंडूवर विक्रम; Video

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

SCROLL FOR NEXT