FIFA World Cup 2022 Portugal beat Uruguay 2-0 to qualify for the last 16 stage Cristiano Ronaldo  sakal
क्रीडा

Portugal vs Uruguay : ख्रिस्तियानो रोनाल्डो चमकला! पोर्तुगालचा उरुग्वेवर मोठा विजय; अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित

सकाळ ऑनलाईन टीम

FIFA World Cup 2022 Portugal vs Uruguay : कडवी लढत देणाऱ्या उरुग्वेचे आव्हान आज पोर्तुगालने २-० असे मोडीत काढत बाद फेरीत प्रवेश केला. बाद फेरीत प्रवेश करणारा पोर्तुगाल फ्रान्स, ब्राझीलपाठोपाठ तिसरा संघ आहे. या विजयात स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि स्ट्रायकर ब्रुनो फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक गोल करीत वाटा उचलला.

पोर्तुगालचा निर्णायक आणि दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकच्या स्वरुपात अगदी शेवटच्या क्षणी आला. उरुग्वेच्या डीमध्ये ब्रुनोला रोखण्याचा प्रयत्न रोचेटने केला. त्यावेळी ब्रुनोचा तोल गेला. अवैधरित्या रोखल्याचा आक्षेप पोर्तुगालने केल्यानंतर व्हिडीओव्दारे रेफ्रींनी पेनल्टी स्ट्रोक बहाल केला आणि ब्रुनोने सहज चकवा देत गोल करीत विजय साकारला.

पूर्वाध शून्य शून्य बरोबरीत संपल्यानंतर उत्तरार्धाची सुरूवात मात्र धमाकेदार झाली. दोन्हीकडून गोल करण्यासाठी कडवे प्रयत्न सुरू झाले. त्यात रोनाल्डोने सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला बाजी मारली. डीच्या मध्यभागी पोर्तुगालच्या ब्रुनो फर्नांडिसने उंचावरून अतिशय छान पास दिला आणि त्या क्षणी मागून धावत आलेल्या रोनाल्डोने पुसटश्या हेडरव्दारे चेंडू गोल जाळ्यात धाडला. त्याक्षणी पोर्तुगालच्या पाठीराख्यांनी जल्लोष केला. रोनाल्डोचा हा विश्वकरंडक स्पर्धेतील नववा गोल होता. उरुग्वेने ७२ व्या मिनिटाला अनुभवी लुईस सुआरेझला मैदानात आणले. यामुळे उरुग्वेच्या आक्रमणाची. धार वाढली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT