Fifa World Cup 2022 
क्रीडा

Fifa World Cup 2022 : कतार झाले फुटबॉलमय...

विश्वचषक स्पर्धेला एक वर्ष बाकी राहिले तेव्हापासून कतार देशात उलट गणती चालू झाली

सकाळ वृत्तसेवा

काम आणि नोकरीच्या निमित्ताने बऱ्याच देशांत जायची संधी लाभली. दोन वर्षांपूर्वी मला दोहा, कतारमध्ये जाऊन काम करायची नवी संधी समोर आली. मी कतारला पोहोचलो तेव्हा कळून चुकले, की देशात २०२२ मध्ये फुटबॉलचा मोठा सण साजरा होणार आहे. होय, विश्वचषक फुटबॉलचे यजमानपद मिळाल्यानंतर कतार देशाने अशक्य नियोजन करून सर्व तयारी दोन वर्षे अगोदरच करून ठेवली. मी दोहाला पोहोचल्यावर कमाल योगायोग असा, की काम करत असलेल्या कंपनीला एका फुटबॉल स्टेडियमचे काम मिळाले. मला त्यानिमित्ताने त्या स्टेडियमची जडणघडण जवळून बघता आली.

विश्वचषक स्पर्धेला एक वर्ष बाकी राहिले तेव्हापासून कतार देशात उलट गणती चालू झाली. टीव्हीतील बातम्या असोत की रेडिओवर चालू असलेले विविध कार्यक्रम असोत, सर्व कार्यक्रमांत फुटबॉल विश्वचषक चालू होण्याला किती दिवस राहिले याची जाणीव करून दिली जात होती. देशातील रस्तेबांधणी खूप प्राधान्य देऊन पूर्ण केली गेली. त्याच्या सोबतीला दळणवळण, खाण्याची ठिकाणे, मनोरंजनाची केंद्रे आणि विविध ठिकाणी सुंदर बागा विकसित केल्या गेल्या. फोन आणि इंटरनेटच्या नेटवर्क सुविधेत आमूलाग्र सुधारणा केली गेली. विश्वचषक स्पर्धांचा आनंद घ्यायला जग लोटणार याचा विचार करून अगोदर बरेच कार्यक्रम आयोजित करून गर्दी हाताळण्याचे तंत्र अनुभवाने विकसित केले गेले.

विश्वचषक स्पर्धांच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाल्यावर जगभरातून मागणी आली. काही तिकिटे खास स्थानिक लोकांसाठी राखून ठेवली गेली, पण त्यालाही प्रचंड मागणी असल्याने लॉटरी काढली गेली. सांगायला आनंद होतोय, की पहिल्या सत्रात मला तिकिटे मिळाली नाहीत, पण लॉटरीच्या दुसऱ्या सत्रात मला दोन सामन्यांची तिकिटे मिळाली ज्यात एक सामना चक्क लीयो मेस्सीच्या संघाचा म्हणजे अर्जेंटिनाचा आहे.

गेले पंधरा दिवस दोहा शहरात होत असलेले बदल मी याची देही याची डोळा अनुभवत आहे. जगभरातून फुटबॉलप्रेमी लोक सर्वोत्तम फुटबॉलचा आनंद घ्यायला कतारला येत आहेत. चाहते आपल्या संघाला प्रोत्साहन द्यायला हजारो डॉलर्स हसत हसत खर्च करून कतारला आले आहेत.

जे लोक कतारला फुटबॉल वर्ल्डकपच्या कामासाठी येत आहेत, त्यांना खास कार्ड देण्यात आले आहे ज्यावरचा क्यूआर कोड स्कॅन करून पाच मिनिटांत त्यांना आत येता येत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक कार चालवून सौदी अरेबियातून सामने बघायला कतारला येत आहेत. त्यांच्याकरिता सौदी अरेबिया-कतार सीमेवर खास सोय करण्यात आली आहे.

मला दोहाला येऊन दोन वर्षे झाली, पण शहरातील वातावरण बघून मलासुद्धा झिंग यायला लागली आहे. इथले वातावरण फुटबॉलमय झाले आहे हे नक्की. तसा मी क्रिकेटप्रेमी आहे, पण आता दर्जेदार फुटबॉल सामन्यांचा आनंद थेट मैदानावर जाऊन घ्यायला मी उतावीळ झालो आहे.

(शब्दांकन : सुनंदन लेले)

ब्राझील : फिफा रँकिंग : १

फुटबॉल आणि ब्राझील यांचे नाते अतुट आहे. प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझील संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असणारा संघ. तसा तो यंदाही आहे. विशेष म्हणजे कमालीच्या फॉर्मात त्यांचा संघ आहे. पात्रता फेरीत सलग १७ सामने अपराजित राहताना इतर संघांना इशाराही दिला आहे. योगायोग म्हणजे २०१८ च्या स्पर्धेत त्यांच्या गटात असलेले स्वीत्झर्लंड आणि सर्बिया हे संग यंदाही त्यांच्या गटात आहेत. गतवर्षी ब्राझीलसह स्वित्झर्लंडने गटातून बाद फेरी गाठली होती. नेमार अर्थातच हुकमी एक्का असेल; परंतु व्हिन्सिस ज्युनियर, रिचार्लसन आणि गॅब्रियल जिजस स्पर्धा गाजवू शकतात. २२ वेळा विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचा पराक्रम. एकूण सामने १०९ यात गोल केले २०९ १९५८, १९६२, १९७०, १९९४ आणि २००२ च्या स्पर्धांत विजेतेपद

स्वित्झर्लंड : फिफा रँकिंग : १५

यंदाही गटातून बाद फेरी गाठण्याची अधिक संधी. अशी कामगिरी त्यांनी गेल्या पाचही विश्वकरंडक स्पर्धेत केली आहे. कर्णधार ग्रॅनिट झाका आणि झेड्रन शकिरी हुमकी खेळाडू. एकूण ११ वेळा विश्वकरंडक स्पर्धेत पात्रता ३७ सामने. त्यात ५० गोल, १९३४, १९३८ आणि १९५४ या स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल

कॅमेरून : फिफा रँकिंग : ४३

ग गटात इतर संघांच्या तुलनेत कमकुवत संघ. १९९० च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर फारसे सातत्य राखता आले नाही. अबोऊबाकर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू. आठ वेळा विश्वकरंडक स्पर्धेत पात्र. यात २३ सामने आणि १२ गोल

सर्बिया : फिफा रँकिंग : २१

स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर २०१० आणि २०१८ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्रता. मात्र या दोन्ही वेळा गटातच आव्हान संपुष्टात. डुसेन अलेक्झांडर मित्रोविक यांच्यावर आक्रमणाची मदार. मित्रोविक हा त्यांचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ४३ गोल त्याच्या नावावर आहेत.

नजरा रोनाल्डोवर

ह गट : पोर्तुगाल, घाना, दक्षिण कोरिया, उरुग्वे

पोर्तुगाल : फिफा रँकिंग : ९

पोर्तुगालचे सामने होतील त्यावेळी सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असणार आहे. हा संघ सलग सहावा विश्वकरंडक खेळत आहे. यातील पाचवी स्पर्धा सुपरस्टार असा लौकिक असणाऱ्या रोनाल्डोची आहे, परंतु एकदाही तो विश्वकरंडक जिंकू शकलेला नाही. ही त्याची अखेरची स्पर्धा असल्याने सर्वस्व झोकून देईल. आता तर त्याने मँचेस्टर युनायटेड या आपल्या क्लबशी पंगा घेतला आहे. खेळण्याची संधीच दिली जात नव्हती असे त्याचे म्हणणे होते, त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत अधिक त्वेशाने खेळण्याची शक्यता आहे. पोर्तुगालला प्रथम गटातच कडव्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. एकीकडे तुल्यबळ उरुग्वे; तर धोकादायक दक्षिण कोरिया आहे. यातील एक सामना गमावला तरी आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

उरुग्वे : फिफा रँकिंग : १४

विश्वकरंडक स्पर्धेचे पहिले विजेते. त्यानंतर आणखी एकदा विजेतेपदाचा करंडक उंचावला, परंतु त्यानंतर अंतिम फेरीही गाठलेली नाही. गत स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात. लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासह हुकमी खेळाडू लुईस सॉरेसची अखेरची स्पर्धा असण्याची शक्यता. पोर्तुगालनंतर बाद फेरी गाठण्याची शक्यता.

घाना : फिफा रँकिंग : ६१

२००६ च्या विश्वकरंडक स्पर्धेत घानाने पदार्पण केले, त्यानंतर प्रत्येक स्पर्धेसाठी पात्रता अपवाद मात्र २०१८ च्या स्पर्धेचा. २०१० च्या स्पर्धेत उरुग्वेने उपउपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी यंदा प्रयत्न.

दक्षिण कोरिया :

फिफा रँकिंग : २९

आशिया खंडातील हा एक सर्वोत्तम संघ. सलग दहा स्पर्धेत खेळण्याचा पराक्रम. स्पर्धेत आतापर्यंत गटात मिळवलेल्या सहापैकी पाच विजय युरोपियन देशांविरुद्ध २००२ च्या स्पर्धेत चौथ्या स्थानापर्यंत मजल. म्हणूनच पोर्तुगाल आणि उरुग्वे मातब्बर संघ असले तरी दक्षिण कोरियाकडून त्यांना धोका होऊ शकतो.

- चंद्रशेखर कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT