FIFA World Cup 2022_Saudi Arebia 
क्रीडा

FIFA World Cup 2022: सौदीच्या खेळाडूंना लॉटरी; प्रत्येकाला मिळणार रोल्स रॉयस

अर्जेंटिनाला पहिल्याच सामन्यात धूळ चारल्यानं युवराज मोहम्मद बिन सलमान खूश

सकाळ डिजिटल टीम

रियाध : दोन वेळेचे विश्वकरंडक विजेत्या अर्जेंटिनाच्या संघाला सौदी अरेबियाच्या संघानं आपल्या सलामीच्याच सामन्यात २-१ असा पराभव केला होता. आपल्या संघाच्या या आश्चर्यकारक विजयनानंतर खूश होऊन सौदी अरेबियाच्या राजघराण्याने देशात एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.

त्यानंतर आता आपल्या देशाच्या संघातील प्रत्येक खेळाडूला राजघराणे पाच लाख युरोची एक रोल्स रॉयस भेट म्हणून देणार आहे. (FIFA World Cup 2022 Saudi Arebia players will get Rolls Royce after beating Argentina)

बलाढ्य अर्जेन्टिनाविरुद्धच्या सामन्यात पूवार्धात १-० अशी पिछाडी असताना देखील सौदी अरेबियाच्या संघानं उत्तरार्धात जबरदस्त आक्रमक खेळ करत सामना २-१ असा जिंकला होता. लिओनेल मेस्सीला बांधून ठेवण्यात सौदी अरेबियाचे खेळाडू यशस्वी ठरले होते. त्यांनी योग्य व्यूहरचना केली होती.

त्यामुळं खूश होऊन आम्ही संघातील प्रत्येकाला एक रोल्स रॉयस देत आहोत, असं राजघराण्यानं जाहीर केलं आहे. "आमचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानुसार ही भेट आम्ही सौदी अरेबियाच्या संघातील प्रत्येक खेळाडूला देत आहोत’’ असं सौदी अरेबियाच्या राजघराण्यातर्फे सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

यापूर्वीही खेळाडूंना रोल्स रॉयस भेट देण्यात आली होती

सौदी अरेबियाच्या राजघराण्यानं देशाच्या फुटबॉल संघातील खेळाडूंना सामना जिंकल्यावर महागडी भेटवस्तू देणं हे काही पहिल्यांदाच घडत नाहीए. सन १९९४च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमवर १-० अशी मात केल्यावर सईद अल-ओवैरान या आक्रमक फळीतून खेळणाऱ्या खेळाडूला रोल्स रॉयस देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT