FIFA World Cup 
क्रीडा

FIFA World Cup : बाद फेरी निश्चितीची स्पेन, जपानला संधी तर इ गटात जर्मनीचे अस्तित्व पणास

सकाळ ऑनलाईन टीम

FIFA World Cup : विश्वकरंडक स्पर्धेत आज इ गटात जपान आणि कॉस्टा रिका यांच्यात सामना होत आहे. यात जपानला अधिक संधी आहे कारण सलामीच्या सामन्यात त्यांनी जर्मनीचा पिछाडीवरून २-१ असा केलेला पराभव आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्याचबरोबर फॉर्मात आलेल्या स्पेनलाही बाद फेरी निश्चित करण्याची संधी आहे.

गतवेळच्या स्पर्धेतही बाद फेरी गाठणाऱ्या जपानला सलग दुसऱ्या वेळी अंतिम १६ संघात स्थान मिळवण्याची प्रथमच संधी मिळणार आहे. साखळी स्पर्धेत जपानचा अखेरचा सामना स्पेनविरुद्ध होणार आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीतूनच त्यांना बाद फेरी निश्चित करावी लागणार आहे. याच वेळी कॉस्टा रिकासाठी स्पेनकडून झालेल्या मोठ्या पराभवातून सावरावे लागणार आहे.

जर्मनीसाठी अस्तित्वाची लढाई

ब्राझीलनंतर सर्वाधिक वेळा विश्वविजेपद मिळालेल्या जर्मनीसाठी उद्याचा सामना अस्तित्वाच्या लढाईसारखाच आहे; पण हा सामना माजी विजेत्या आणि फॉर्मात आलेल्या स्पेनविरुद्ध असल्यामुळे जर्मनीसमोर कठीण आव्हान आहे. जपानविरुद्ध सलामीची लढत आघाडी घेऊनही गमावल्यामुळे जर्मनीने ही परिस्थिती ओढावून घेतली आहे.

दृष्टिक्षेपात

  • प्रथमच सलग दोन विजय मिळवण्याची जपानला संधी. २००२ आणि २०१८ च्या स्पर्धेत त्यांनी दोन सामने जिंकले होते; परंतु ते सलग नव्हते.

  • गेल्या पाचपैकी चार विश्वकरंडक सामन्यांत जपानने प्रत्येकी दोन गोल केले आहेत.

  • कॉस्टा रिकाचा आशियाई देशातील संघाविरुद्ध अखेरचा विजय चीनविरुद्ध २००२ मध्ये त्यांनी चीनला २-० हरविले होते. त्यामुळे इतिहास त्यांच्या बाजूने नाही.

  • स्पेनविरुद्ध गोल करणारा जेविसन बेनेट्टी (१८ वर्षे १६१ दिवस) हा कोस्टा रिकाकडून गोल करणारा सर्वात लहान खेळाडू. यात सामन्यात कॉस्टा रिकाकडून खेळलेला ब्रायन रुईस (३७ वर्षे ९७ दिवस) हा सर्वात वयस्क खेळाडू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT