FIFA World Cup 2022 sakal
क्रीडा

fifa world cup 2022 : विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांच्या वेळा लांबल्या

सामन्यांचा कालावधी आपोआप ९० मिनिटांपेक्षा जास्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

दोहा : कतारमध्ये रविवारपासून सुरू झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे सामने नेहमीच्या ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ खेळवले जात असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच सामन्यांत कधी दुखापतीमुळे; तर कधी खेळाडूंच्या वेळकाढूपणामुळे वाया गेलेला सामन्याचा कालावधी मैदानावरील पंचांमार्फत भरपाई वेळेत वाढ करून भरून काढला जात आहे. त्यामुळे सामन्यांचा कालावधी आपोआप ९० मिनिटांपेक्षा जास्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना फिफा पंचांचे प्रमुख पियरलुगी कोलिना म्हणाले, की ‘‘फिफातर्फे आम्हा पंचांना सामना पूर्णपणे खेळवण्यात यावा याकरीता बारीक लक्ष द्या असा आदेश देण्यात आला आहे. सामन्यातील जेवढा वेळ वाया जाईल तो पूर्णपणे नीट लक्ष देऊन भरून काढण्यात यावा, असेदेखील फिफाने म्हटले आहे.’’ तसेच रशियात २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेतसुद्धा सात ते दहा मिनिटे भरपाई वेळ दिला गेल्याचे त्यांनी सांगितले.

फिफाकडून मैदानावरील आणि सामन्यांच्या पंचांना फुटबॉल लढतीतील वाया गेलेला वेळ पूर्णपणे भरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी झालेल्या सर्वच सामन्यांत मैदानावरील पंचांकडून भरपाई वेळेचा पुरेपूर वापर झाल्याचे दिसून आले. इंग्लंडमध्ये १९६६ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपासून भरपाई वेळेची नोंद फिफातर्फे ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त काळ या वेळेचा उपयोग या स्पर्धेत झाल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध इराणच्या सामन्यातील उत्तरार्धात पंचांकडून एकूण १३ मिनिटे आणि आठ सेकंदांचा भरपाई वेळ देण्यात आला होता; तर याच सामन्याच्या पूवार्धात इराणच्या गोलरक्षकाच्या डोक्याला दुखापत झाल्याने पंचांकडून १४ मिनिटे आणि आठ सेकंद जास्त वेळ देण्यात आला होता.

अमेरिका विरुद्ध वेल्स आणि नेदरलँड विरुद्ध सेनेगल यांच्यातील सामन्यांतसुद्धा १० मिनिटांपेक्षा जास्त भरपाई वेळ देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT