FIFA World Cup 2022 US journalist Grant Wahl dies sakal
क्रीडा

FIFA WC: कतारमध्ये अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू! फिफा वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात

समलिंगी समुदायाशी संबंधित टी-शर्ट घातल्यानंतर अमेरिकन पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्याचा मृत्यू झाला

Kiran Mahanavar

FIFA World Cup 2022 US journalist Grant Wahl dies : फिफा विश्वचषक 2022 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विविध कारणांमुळे ही स्पर्धा उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. कतारमधील समलैंगिकतेबाबत कठोर कायदे हा त्यापैकीच एक आहे. याच कारणामुळे पुन्हा एकदा कतार आणि फिफा विश्वचषक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कतारमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. ग्रँट वहल असे या पत्रकाराचे नाव आहे. ग्रँट हा तोच पत्रकार आहे ज्याने काही दिवसांपूर्वी वृत्त दिले होते की समलिंगी समुदायाचे समर्थन करणारा शर्ट परिधान केल्याबद्दल त्याला कतारमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्याचवेळी त्यांना मोठा धक्का बसल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. ग्रँटचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. इंग्लंडचा स्टार खेळाडू डेव्हिड बेकहॅम अमेरिकेत स्टार बनण्यावर ग्रँटने पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक खूप गाजले होते.

काय होता वाद?

फिफा विश्वचषकाचे कव्हर करताना ग्रँटने सांगितले की, यूएस संघाच्या वेल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला नाही कारण त्याच्या शर्टवर फुटबॉल काढलेला होता आणि त्याच्याभोवती इंद्रधनुष्याचे रंग होते. (इंद्रधनुष्याचे रंग समलिंगी समाजाचे प्रतीक आहेत.) त्यानंतर त्याला सुमारे 30 मिनिटे ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सोडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

Amravati Crime News : साहील लॉनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे खून; अमरावतीत १७ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणी मोठा खुलासा...

Pune Temperature : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुणे शहर परिसरात थंडीचा प्रभाव

Black Magic : भूतबाधेच्या अंधश्रद्धेतून विवाहितेवर अमानुष हल्ला; पाच वर्षांच्या मुलासमोरच कडुलिंबाच्या काठ्यांनी क्रूरपणे मारहाण

SCROLL FOR NEXT