fifa world cup 2022 winner Argentina richer by prize money 350 Crore  
क्रीडा

FIFA WC22: अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस! जाणून घ्या कोण किती झालं मालामाल

अर्जेंटिनाने विश्वचषकातील युरोपचे वर्चस्व संपवले...

Kiran Mahanavar

FIFA World Cup 2022 Winner Argentina: फिफा विश्वचषक 2022च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला आहे. नियमित वेळेत स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता आणि नंतर अतिरिक्त वेळेत स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवत लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण केले. या विश्वचषकात मोठी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती, जी विजेत्या संघाकडून गट टप्प्यात खेळणाऱ्या संघाला वाटण्यात आली. चला जाणून घेऊया कोणत्या संघाला किती बक्षीस मिळाले.

विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाला 42 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 348 कोटी 48 लाख रुपये) मिळाले आहेत. स्पर्धेतील उपविजेत्या फ्रान्सला 30 दशलक्ष डॉलर (सुमारे 248 कोटी 20 लाख रुपये) मिळतील. फिफाने या विश्वचषकासाठी $440 दशलक्ष (रु. 36 अब्ज, 40 कोटी आणि 27 लाख) बक्षीस रक्कम निश्चित केली होती.

अर्जेंटिनाकडून शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या विश्वचषक कारकिर्दीचा शानदारपणे शेवट केला. नियमित वेळेत स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता आणि नंतर अतिरिक्त वेळेत स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने शानदार कामगिरी करत सामना जिंकला. लिओनेल मेस्सीने सामन्यात दोन गोल केले, यानंतर किलियन एम्बापेने गोल करत स्कोअर 3-3 असा बरोबरीत आणला आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. मेस्सीने शूटआऊटमध्येही गोल केला आणि काही संधी फ्रान्सने गमावल्या आणि अर्जेंटिनाला त्याचा फायदा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT