India Lose 1-2 vs Afghanistan FIFA World Cup 2026 qualifiers  sakal
क्रीडा

FIFA World Cup 2026 Qualifiers : भारताच्या फिफा वर्ल्डकपमध्ये खेळण्याच्या आशांना अफगाणिस्तानने लावला सुरुंग

Kiran Mahanavar

India Lose 1-2 vs Afghanistan FIFA World Cup 2026 qualifiers : भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. फिफा क्रमवारीत १५८व्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने ११७व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघावर २-१ असा विजय मिळवला. या पराभवामुळे भारताच्या फिफा विश्‍वकरंडक आशियाई पात्रता पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.

भारतीय संघाचा महान खेळाडू सुनील छेत्री याने अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या कारकिर्दीचा १५०वा सामना खेळला. या लढतीत त्याने संस्मणीय गोलही केला. ३८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करीत त्याने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने पूर्वार्धात ही आघाडी कायम ठेवली.

भारतीय संघाने उत्तरार्धातही आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र ७० व्या मिनिटाला रहमत अकबारी याने अफगाणसाठी अफलातून गोल करीत त्यांना बरोबरी साधून दिली. तसेच सामना संपायला काही मिनिटे बाकी असतानाच शरीफ मुखम्मद याने अफगाणिस्तानसाठी दुसरा गोल करीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अ गटामध्ये कतारचा संघ ९ गुणांसह पहिल्या स्थानावर असून भारतीय संघ चार गुणांसह दुसऱ्या, तर अफगाणिस्तानचा संघ चारच गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. कुवेत तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या उर्वरित दोन लढती सहा जून रोजी कुवेत व ११ जून रोजी कतारशी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT