Portugal vs Switzerland FIFA World Cup 2022 sakal
क्रीडा

FIFA World Cup22 : अर्धा डझन गोल! पोर्तुगालने स्वित्झर्लंडचे मोडले कंबरडे

स्वित्झर्लंडचा धुव्वा ; रामोसची हॅट्रिक, आता लढत मोरोक्कोशी

Kiran Mahanavar

Portugal vs Switzerland FIFA World Cup 2022 : स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानात नसतानाही पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा ६-१ असा धुव्वा उडविला आणि उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. तेथे त्यांची लढत आता स्पेनला पराभूत करणान्या मोरोक्कोशी होणार आहे. रोनाल्डोच्या जागी संघात आलेल्या गोंकालो रामोसने केलेली हॅटट्रिक, वयस्क खेळाडू पेपे याने मारलेला जबरदस्त हेडर तसेच राफाईलो आणि लेओचे गोल यामुळे स्वित्झर्लंडचे कंबरडे मोडले. रोनाल्डो बाकावर बसून सामन्याचा मनमुराद आनंद घेता होता.

विश्वकरंडकातील आपला पहिलावहिला सामना खेळणाच्या २१ वर्षीय रामोसने भविष्यातील स्टार असल्याची झलक दाखवून दिली. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला फेलिक्सचा श्री इन रामोसकडे येताच त्याने तो नियंत्रित करीत अशक्य कोटीतील कोनातून मारलेला फटका स्वीस गोलरक्षकाला चुकवत गोलपोस्टच्या डाव्यावरील कॉर्नरमधून नेटमध्ये विसवला. आणखी १३ मिनिटांनी ३९ वर्षीय पेपेने आपण अजून का मैदानात आहे. याची प्रचीती दिली. ब्रुनो फनडे याने कॉर्नरवरून डीच्या मध्यभागी चेंडू फटकावला. तेथे पेपे दोन स्वीस रक्षकांनी घेरला होता; पण त्याने मोका साधला आणि भन्नाट हेडर करीत गोल केला. दहा मिनिटांनी रामोसचा एक फटका गोलरक्षकाने चपळाईने रोखला.

उत्तरार्धात पुन्हा रामोसने सामन्याच्या ५० व्या मिनिटाला स्वीसच्या संरक्षकाकडून चेंडू काढत दलोडकडे दिला. त्याने विल करीत पुन्हा रामोसच्या दिशेने क्रॉस पास देताच त्याने धाडदिशी गोल केला. त्यानंतर चारच मिनिटांनी राफाईलो गेहेरिरोने रामोसच्या अचूक पासवर गोल करीत आघाडी ४० अशी केली. स्वोसला मॅन्युएल अकांजी याच्या रूपाने यश आले. स्वीसचा हा बाद फेरीतील १९५४ नंतरचा पहिला गोल आहे. रामोसने पुन्हा कमाल करताना सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला पुन्हा गोल डागत हॅटट्रिक साधली. या दरम्यान, ७६ व्या मिनिटाला रोनाल्डो बदली खेळाडू म्हणून उत्तरला. त्याला डीच्या बाहेर फ्रि किक मिळाली; पण ती वॉलवरच जाऊन आदळली. जादा वेळेत पोर्तुगालच्या राफेल लेओने गोल डागत विजयावर शिक्कामोर्तब केले.

यंदाची पहिलीच हॅट्रिक

  • पोर्तुगालचा २१ वर्षीय रामोसची हॅटट्रिक

  • रामोसचा हा पहिलाच विश्वकरंडक आणि त्यात सामनाही पहिलाच

  • यंदाच्या विश्वकरंडकातील पहिली हॅटट्रिक

  • ख्रिस्तियानो रोनाल्डोऐवजी अंतिम अकरामध्ये रामोसला स्थान

  • १९ वर्षाखालील गटातही रामोसची पोर्तुगालकडून हॅट्ट्रिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT