Lionel Messi vs lewandowski sakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : लिओनेल मेस्सी विरुद्ध लेवांडोवस्क

अर्जेंटिना किंवा पोलंड, कोण गाठणार आज बाद फेरी

सकाळ वृत्तसेवा

दोहा : अर्जेंटिना आणि पोलंड असा उद्याचा सामना दोघांसाठी बाद फेरीचे भवितव्य निश्‍चित करणारा आहे; परंतु या लढतीकडे लिओनेल मेस्सी विरुद्ध त्याच्याच पूर्वाश्रमीच्या बार्सिलोना क्लबमधील सहकारी रॉब्रेट लेवांडोवस्की यांच्यातही रंगणार आहे. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क गटात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सद्यपरिस्थितीत पोलंडचे एक पाऊल पुढे असले, तरी उद्याच्या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. मेस्सी ३५ वर्षांच तर लेवांडोवस्की ३४ वर्षांचा आहे. ही विश्वकरंडक स्पर्धा दोघांसाठी अखेरची असणार आहे. त्यामुळे एका खेळाडूचा विश्वकरंडक स्पर्धेतला सूर्यास्त होणार, हे निश्चित आहे.

सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाकडून पराभूत झाल्यामुळे अर्जेंटिनावर अखेरच्या सामन्यापर्यंत जीव टांगणीला राहण्याची परिस्थिती ओढावली आहे. मात्र त्या सामन्यानंतर मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातही मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाच्या आव्हानात हवा भरली आहे. मेस्सीची ही पाचवी विश्वकरंडक स्पर्धा असून अर्जेंटिनाला पुन्हा विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पोलंडविरुद्धच्या लढतीत आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आम्ही मेक्सिकोला हरवून दडपण दूर केले, असे मेस्सी म्हणाला.

मेस्सीप्रमाणे लेवांडोवस्कीही त्याच्या देशाकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. दोघे एकत्र बार्सिलोना क्लबमधून खेळलेले असल्यामुळे एकमेकांचे खेळ ते चांगलेच जाणतात. मेस्सीने सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टी कीकवर गोल केला होता; तर मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत पोलंडला मिळालेल्या पेनल्टीवर लेवांडोवस्की गोल करू शकला नव्हता. परिणामी तो सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यानंतर लेवांडोवस्कीने विश्वकरंडक स्पर्धेत आपला पहिलावहिला गोल केला. त्यामुळे पोलंडने सौदी अरेबियावर २-० अशी मात केली होती.

मी जेवढा वयस्क होत आहे तेवढा मी भावूक होत आहे, ही विश्वकरंडक स्पर्धा आपल्यासाठी अखेरची स्पर्धा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी अधिक भावनिक आहे, असे लेवांडोवस्की म्हणाला. १९८६ नंतर पोलंडने विश्वकरंडक स्पर्धेची बाद फेरी गाठलेली नाही. उद्या अर्जेंटिनावर विजय किंवा बरोबरी त्यांना पुढचे पाऊल टाकण्यास पुरेशी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, जयंत पाटलांविरोधात फुकले रणशिंग

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT