fir against india badminton player lakshya sen coach vimal kumar and family for age fraud cheating
fir against india badminton player lakshya sen coach vimal kumar and family for age fraud cheating sakal
क्रीडा

Lakshya Sen : अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष सेन वयचोरीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारताचा आघाडीचा बॅडमिंटन खेळाडू आणि सध्याचा कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन यांच्याविरुद्ध बंगळूरमध्ये वयचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम गोविअप्पा नागराजा यांनी बंगळूरमध्ये लक्ष्य सेन, त्याचे कुटुंबीय आणि बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांना या वयाच्या फसवणुकीकरिता जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्य आणि त्याचा मोठा भाऊ चिराग हे दोघेही २०१० पासून विविध स्तरांवरच्या बॅडमिंटन स्पर्धेत खेळावयास मिळण्यासाठी वय लपवत आहेत, असे नागराजा यांनी या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत सेन याचे वडील धीरेंद्र, आई निर्मला आणि प्रशिक्षक कुमार यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि भारतीय दंडसंहितेच्या ३४ व्या कलमानुसार दोषी ठरवण्यात यावे, असेही नागराजा यांनी म्हटले आहे.

मात्र भारतीय बॅडमिंटन संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक कुमार यांनी या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. लक्ष्य आणि त्याच्या भावाच्या वयचोरीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘मी दोघांनाही फार लहानपणापासून ओळखत आहे. असे तथ्यहीन आरोप करून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर आताच सुरू झालेली कारकीर्द धोक्यात यायची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. देशातील कोणत्याही खेळाडूच्या वयासंबंधी निर्णय घ्यायचा सर्वोच्च अधिकार हा भारतीय बॅडमिंटन संघटनेचा असतो आणि ती संघटना सगळे व्यवस्थित तपासून निर्णय घेत असते. मी स्वतः गेली ३० वर्षे बॅडमिंटनचे प्रशिक्षण देत असून; युवा खेळाडूंची कारकीर्द कशी घडवायची हे मला चांगलेच ठावूक आहे. त्यामुळे खेळाडूंचे पर्यायाने देशाचे नाव कशा प्रकारेही खराब होईल अशी वागणूक माझ्याकडून होणे अशक्य आहे.’’

लक्ष्य सध्या बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. त्याला आताच देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ब्राँझ पदक जिंकले होते; तर या वर्षीच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचासुद्धा तो उपविजेता राहिला आहे.

लक्ष्य याने भारतीय बॅडमिंटन संघटनेकडे त्याचा जन्मदिवस १६ ऑगस्ट २०२१ असा नोंदवला आहे; तर चिरागने २२ जुलै १९९८ असे नोंदवले आहे, पण तक्रारदारांच्या मते लक्ष आणि चिराग यांचे अनुक्रमे वय २४ व २६ आहे. लक्ष्य आणि चिरागवरचे हे वयचोरीचे आरोप सिद्ध झाल्यास दोघांनाही त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवर पाणी सोडावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT