Eden Garden Stadium  esakal
क्रीडा

Eden Garden Stadium : आधी वेळापत्रकाचा गोंधळ आता स्टेडियमलाच लागली आग... बीसीसीआयच्या अडचणीत वाढ

अनिरुद्ध संकपाळ

Eden Garden Stadium World Cup 2023 BCCI : बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या नियंत्रणात असलेल्या कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियममध्ये वर्ल्डकपपूर्वीच एक मोठा दुर्घटना झाली. स्टेडियमवच्या ड्रेसिंग रूमला भयानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री स्टेडियमच्या ड्रेसिंग रूमला अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथ दाखल झाले अन् त्यांनी मोठ्या कष्टाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत ड्रेसिंग रूमचे मोठे नुकसान झाले आहे. (Eden Garden Stadium Fire News)

ड्रेसिंग रूमचे मोठे नुकसान

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला रात्री 12 वाजण्याच्या सुमासार इडन गार्डन स्ट्रेडियमच्या ड्रेसिंग रूमला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्ठळी दाखल झाले आणि एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

अग्निशमन दिलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. या आगीत ड्रेसिंग रूममधील छत हे पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर ड्रेसिंग रूममधील सामान देखील जळला आहे.

इडन गार्डनवर वर्ल्डकपमधील सामन्यांचे आयोजन

भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपमधील काही सामने हे इडन गार्डनवर देखील होणार आहेत. या स्टेडियमवर पहिला सामना हा 28 ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी नेदरलँड विरूद्ध बांगलादेश अशी लढत होईल.

भारतीय संघ इडन गार्डनवर आपला पहिला सामना 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे. नुकतेच आयसीसीचे एक पथक या स्टेडियमची पहाणी करून गेलं होतं.

आसीसीची वाढली चिंता

काही दिवसांपूर्वीच बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयसीसीला पाकिस्तानच्या सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनने इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दिवाळीदिवशी होणऱ्या सामन्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

यानंतर या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आता स्टेडियममध्येच आग लागल्याने आयसीसीच्या चिंतेत वाढ झाली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT