Paris Olympics Rowing sakal
क्रीडा

Paris Olympics Rowing : बलराज पन्वरकडून ऑलिंपिक कोटा ; रोईंग खेळात पात्रता मिळवणारा पहिलाच भारतीय

बलराज पन्वर याने रविवारी भारताला रोईंग या खेळामध्ये पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवून दिला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बलराज पन्वर याने रविवारी भारताला रोईंग या खेळामध्ये पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवून दिला. दक्षिण कोरिया येथील चुंगजू येथे जागतिक, आशियाई ऑलिंपिक, पॅरालिंपिक पात्रता फेरी सुरू असून बजरंग याने पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात भारतासाठी संस्मरणीय कामगिरी केली. त्याने तिसरा क्रमांक मिळवला.

२५ वर्षीय बलराज याचे चीन येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये थोडक्यासाठी ब्राँझपदक हुकले होते. यंदा ऑलिंपिक पात्रता फेरीत त्याने २००० मीटर शर्यत ७.०१.२७ अशा वेळेसह पूर्ण करताना ऑलिंपिक कोटाही मिळवला. या शर्यतीत अव्वल पाच क्रमांकामधील खेळाडूंना ऑलिंपिक कोटा मिळणार होता. भारताच्या खेळाडूने तिसरा क्रमांक पटकावत आपले ध्येय पूर्ण केले.

दरम्यान, पॅरा ऑलिंपिक पात्रता फेरीतील मिश्र डबल स्कल प्रकारात नारायण के. व अनिता या भारतीय जोडीने पहिल्या स्थानावर झेप घेतली. दोघांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताला पॅरिस पॅरालिंपिकचा कोटाही मिळाला.

उज्ज्वल, अरविंदचे अपयश

पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये भारतीय खेळाडूंना अपयश आले. उज्ज्वलकुमार व अरविंद सिंग या भारतीयांनी या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या शर्यतीत पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळणार होता. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडू या प्रकारात पात्र ठरले होते.

कझाकस्तानच्या खेळाडूला सुवर्ण

पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात बलराज पन्वर याने तिसरा क्रमांक पटकावला. अर्थातच त्याने ब्राँझपदक जिंकले. याच प्रकारात कझाकस्तानच्या व्लॅडीस्लाव याकोव्लेव याने ६.५९.४६ अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच इंडोनेशियाच्या मेमो मेमो याने रौप्यपदक आपल्या नावावर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT