Indian Women Olympian Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: जेव्हा भारताच्या महिलांनी इतिहास घडवला...! जाणून घ्या आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये कोणी जिंकलेत मेडल्स

Olympic Medal Winners Indian Women Athletes: ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण होती आणि आत्तापर्यंत मेडल्स जिंकणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Olympic Medal Winners Indian Women Athletes: पॅरिस ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २६ जुलै रोजी या खेळांच्या कुंभमेळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणात महिला खेळाडूही उतरत आहेत.

या स्पर्धेत अनेक महिलांनी मोठमोठे विक्रमही केले आहेत. भारतीय महिला खेळाडूंनीही या स्पर्धेत गेल्या काही वर्षात मोठे यश मिळवले आहे.

पहिला सहभाग

भारताचे प्रतिनिधित्व सर्वात पहिल्यांदा १९२४ साली नोरा मार्गारेट पॉली या महिला टेनिस खेळाडूने ऑलम्पिकमध्ये केले होते. पण त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होतं. तिने महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली ६० पुरुषांसह भारतीय महिला खेळाडूंनीही हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. त्यावेळी १७ वर्षांच्या असलेल्या निलिमा घोष हिने १०० मीटर धावणे आणि ८० मीटर हर्डल स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

ती ऑलिम्पिकमध्ये खेळणारी स्वातंत्र्य भारताची पहिली महिला खेळाडू होती. तिच्यासह मुंबईच्या मेरी डिसोझा सिक्वेरा हिनेही १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत भाग घेतलेला. याशिवाय जलतरणपटू डॉली नाझिर आणि आरती साहा यांनीही १९५२ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

आत्तापर्यंतच्या पदक विजेत्या भारतीय महिला खेळाडू

दरम्यान, यानंतर जवळपास ५ दशकांनी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने पदक जिंकून इतिहास रचला. ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. तिने वेटलिफ्टिंगमध्ये हा कारनामा केला होता.

यानंतर २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने बॅडमिंटन आणि मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदके जिंकली.

साल २०१६ मध्ये रिओला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य, तर कुस्तीमध्ये साक्षी मलिकने कांस्य पदक पटकावलं. यानंतर २०२१ साली टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलं. ती कर्णम मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरीच भारतीय ठरली.

याशिवाय लवलिना बोर्गोहेन हिनेही कांस्य पदक जिंकलं, तर सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकलं. त्यावेळी सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

दरम्यान, आता आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही अनेक भारतीय महिला खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT