first picture of anushka sharma and virat kohli daughter vamika  Twitter
क्रीडा

VIDEO : ... अन् विरुष्काच्या लेकीचा चेहरा झळकला टीव्हीवर

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिका आणि भारत (South Africa vs India) यांच्यातील तिसरा वनडे सामना केपटाऊनच्या मैदानात रंगला आहे. 288 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतकासह संघाचा डाव सावरला. त्याने वनडे कारकिर्दीतील 64 वे अर्धशतक झळकावले. शतकापासून तो पुन्हा वंचित राहिला. केशव महाराजनं 65 धावांवर कोहलीला बाद केले. तत्पूर्वी कोहलीच्या अर्धशतकानंतर वामिकाची खास झलक पाहायला मिळाली. किंग कोहलीच्या अर्धशतकानंतर VVIP गॅलरीतून सामन्याचा आनंद घेणाऱ्या अनुष्का शर्माकडे (Anushka Sharma) कॅमेरा वळला. (first picture of anushka sharma and virat kohli daughter vamika)

कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लेकीकडे पाहत खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे अनुष्का शर्मा (Anushka Sharma) वामिकासोबत (Vamika) कोहलीच्या अर्धशतकाचा आनंद साजरा करताना दिसली. पहिल्यांदाच वामिकाचा चेहरा सर्वासमोर आल्याचे पाहायला मिळाले. कोहली आणि अनुष्का यांनी वामिकासोबतचे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण तिचा चेहरा सर्वांना दिसणार नाही याची काळजी दोघांनीही घेतली. तिला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिचा चेहरा समोर येऊ नये, अशी भावना या स्विट कपलनं व्यक्त केली होती. पण कोहलीच्या अर्धशतकानंतर कॅमेरा अनुष्का वामिकाकडे फिरला अन् पहिल्यांदाच अनुष्कासोबत वामिकाचा चेहरा सर्वांना दिसला.

वामिका सेम टू सेम कोहलीवर गेलीये

सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि वामिकाचा व्हीव्हीआयपी गॅलरीतील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनुष्काचा फर्स्ट लूकवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. वामिकाचा चेहरा सेम टू सेम कोहलीशी मिळता जुळता आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. काहीजण कोहलीचा लहानपणीचा फोटोसह वामिका विराटची कार्बन कॉपी असल्याचे सांगताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Explained: NDA अंतर्गत मोठा राडा! मोदींच्या खुर्चीला देखील हादरे, बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?

Nashik Police : दिवाळीत घरफोडी करणाऱ्यांची खैर नाही! नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांकडून दिवस-रात्र गस्ती पथकांत मोठी वाढ

Viral Video : क्या हाल है भाई! Rohit Sharma ने नवा कर्णधार शुभमनला पाहताच विचारला प्रश्न, विराट कोहलीला केला मुजरा; मन जिंकणारा क्षण

Latest Marathi News Live Update : मुंबई एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेत राडा

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक महापालिकेची मोठी मागणी: ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करणार

SCROLL FOR NEXT