Transgender cricketer Danielle Mcgahey  esakal
क्रीडा

Transgender cricketer : पुरूष झाली स्त्री! पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू 'या' संघाकडून खेळणार आंतरराष्ट्रीय सामना

अनिरुद्ध संकपाळ

Transgender cricketer Danielle Mcgahey : कॅनडाची डॅनिले मॅकगाहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपूट ठरणार आहे. ती बांगलादेश मध्ये होणाऱ्या 20 वर्ल्डकप पात्रता फेरीतील सामन्यात खेळणार आहे. 29 वर्षाची कॅकगाहे पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी कॅनडाच्या संघात निवडली गेली आहे. ही पात्रता फेरी चार सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरपर्यंत लॉस एंजिलिस येथे खेळवली जाणार आहे.

पुरूषाची स्त्री झालेल्या खेळाडूसाठी आयसीसीचे काही खास नियम आहेत. या सर्व नियमात डॅनिले बसते म्हणून तिला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही ट्रान्सजेंडर महिला क्रिकेपूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तिची टेस्टोस्टेरॉनची पातळी 12 महिन्यापर्यंत सातत्याने 5nmol प्रति लीटरच्या खाली असावी लागते.

जागतिक पात्रता फेरीत अमेरिकन क्वालिफायरमध्ये कॅनडाचा सामना हा अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिकेशी होणार आहे. दरम्यान मॅकगाहेने बीबीसी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला खूप सन्मानित झाल्या सारखं वाटतंय. माझ्या समुदायाचं प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न साकार झालं आहे.'

डॅनली ही 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियावरून कॅनडा येथे आली. तिने नोव्हेंबर 2020 मध्ये पुरूषापासून महिला झाली. तिच्यात वैद्यकीय बदल हे 2021 पासून सुरू झाले. आयसीसीने याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. 'डॅनलीने आयसीसीच्या पात्रता संबंधीच्या सर्व अटी शर्तींची पूर्तता केली आहे. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पात्र झाली आहे.'

याबाबत डॅनली म्हणाली की, 'माझ्या टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासण्यासाठी मी गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याला रक्ताचे नमुने देत होते. क्रिकेट खेळताना कायम प्रवास करावा लागतो. त्यामुळे हे थोडं अडचणीचं होतं. मला गर्व आहे की मी फक्त माझे नाही तर संपूर्ण ट्रान्सजेंडर समुदायाचं प्रतिनिधित्व करणार आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT