क्रीडा

जर्मनीला निसटत्या विजयाचे समाधान

वृत्तसंस्था

माद्रिद - जगज्जेत्या जर्मनीला अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपवल्याचे समाधान लाभले. त्यांनी या वर्षातील पहिलाच विजय मिळविताना सौदी अरेबियाचे कडवे आव्हान २-१ असे परतविले.

काही दिवसांवर आलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील लढतीत इराण, क्रोएशिया, स्वित्झर्लंडनेही बाजी मारली; पण त्याच वेळी पोलंडला चिलीविरुद्ध २-२ बरोबरी स्वीकारावी लागली. तीन दशकांत प्रथमच सलग पाच लढतींत जर्मनीस विजय लाभला नव्हता. त्यांनी ही कटू मालिका संपवण्याच्या उद्देशाने सुरवात केली. विश्रांतीस २-० आघाडी घेतली; पण त्यानंतर त्यांनी सौदीचा प्रतिकार जेमतेमच रोखला. 

सामन्याच्या अंतिम टप्प्यात सौदीने आपण काय करू शकतो, याची झलकच फुटबॉल जगतास दिली. त्यांनी बचावावर भर देण्यास जर्मनीस भाग पाडले. एवढेच नव्हे तर हा बचाव वारंवार भेदलाही. भरपाई वेळेत सौदीची पेनल्टी किकची जोरदार मागणी फेटाळली गेली आणि जर्मनीने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

गोलच्या संधी सोडल्या. बचावात अनेक जागा सोडत प्रतिस्पर्ध्यांना आक्रमणाची संधी दिली. नशिबाची साथ असल्यामुळेच जिंकलो, असे जर्मनीचे मार्गदर्शक लोव यांनी सांगितले. त्याच वेळी प्रत्यक्ष स्पर्धेत नक्कीच प्रभावी कामगिरी होईल, असा दिलासा दिला. 

दरम्यान, क्रोएशियाने सुरवातीच्या पिछाडीनंतर सेनेगलला नमवले. स्वित्झर्लंडने जपानचा पराभव केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT