Neymar Sakal
क्रीडा

Fifa world cup 2022 Neymar : नेमारच्या पुनरागमनाचा प्रशिक्षक टीटे यांना विश्वास

ब्राझीलच्या आक्रमक फळीतून खेळणारा नेमार सर्बियाविरुद्धच्या सामन्यात घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे लढत अर्धवट सोडून बाहेर बाकावर बसला होता

सकाळ वृत्तसेवा

दोहा : ब्राझीलच्या आक्रमक फळीतून खेळणारा नेमार सर्बियाविरुद्धच्या सामन्यात घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे लढत अर्धवट सोडून बाहेर बाकावर बसला होता. तो ग गटातील ब्राझीलच्या उर्वरित सामन्यांना मुकणार हे जवळपास निश्चित आहे. तरी नेमार ब्राझीलचे बाद फेरीतील सामने खेळेल असा आत्मविश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक टीटे यांनी बोलून दाखवला आहे. तर नेमारवर २४ तास फिजिओथेरपी करण्यात आली आहे आणि आता तो दुखापतीमधून सावरत आहे असा विश्वास ब्राझीलच्या बचावफळीतून खेळणाऱ्या मार्किनहोस याने व्यक्त केला आहे.

‘‘सर्बियाविरुद्धाच्या सामन्यात निकोला मिलेंकोविचला धडकल्याने नेमारच्या घोट्याला दुखापत झाली होती. ही दुखापत झाली तरी तो काही वेळ मैदानावर होता. मला आणि संघातील खेळाडूंपैकी कोणालाच त्याच्या दुखापतीबद्दल जास्त काही माहिती नव्हते. परंतु तो ज्या क्षणी मैदानावर वेदना असहाय्य झाल्यामुळे पडला , त्या क्षणी नेमारला आम्ही बाकावर बसवण्याचे ठरवले. आमच्या बचावफळीतून खेळणाऱ्या डॅनिलोस हा सुद्धा दुखापतग्रस्त असून ; हे दोघेही ब्राझीलच्या संघाचे विश्वकरंडकाच्या बादफेरीमध्ये प्रतिनिधित्व करतील अशी ग्वाही आहे,’’ असे टिटे आज स्वित्झर्लंड विरुद्धच्या सामन्याअगोदर म्हटले.

नेमारच्या दुखापतीबद्दल तो स्वतःच अधिक माहिती देऊ शकेल. आम्ही त्याच्या आणि डॅनिलोसच्या दुखापतीवर फक्त लक्ष ठेवून आहोत आणि संघाच्या डॉक्टरांना जी काही मदत लागत आहे ती करत आहोत असेही टीटे पुढे म्हणाले. तर मार्किनहोस याने नेमार यंदाचा फुटबॉल विश्वकरंडक उंचावण्यास तयार असून ; त्याच्याशी बोलताना ही स्पर्धा जिंकण्याची भूक त्याच्यात शिल्लक असल्याचे दिसत आहे , असे मत व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT