Eden2
Eden2 
क्रीडा

चेंडू दवाने ओला होऊ नये म्हणून डे-नाईट टेस्टसाठी गवत कुठे, किती हवे?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  बहुचर्चित डे-नाईट कसोटीच्यासंदर्भात गुलाबी चेंडूशिवाय अनेक मुद्दे औत्सुक्‍य निर्माण करणारे आहेत. यातील खेळपट्टी आणि मैदानाबद्दल अनुभवी क्‍युरेटर दलजित सिंग यांनी भाष्य केले आहे. 22 यार्ड पट्ट्यावर जास्त गवत ठेवावे, तर बाहेरील मैदानावर (आउटफिल्ड) ते नेहमीपेक्षा कमी असावे. त्यासाठी आजपासूनच कामाला लागावे, अशी त्यांची सूचना आहे. 

दलजित हे "बीसीसीआय'चे मुख्य क्‍युरेटर होते. 22 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते गेल्याच महिन्यात निवृत्त झाले. 77 वर्षीय दलजित पंजाब क्रिकेट संघटनेसाठी अजूनही सक्रिय असून तेथील खेळपट्टीची निगा राखण्यावर देखरेख करतात. 

रात्री दव जास्त पडत असल्यामुळे तो डे-नाईट टेस्टमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरतो. दवाचा परिणाम अटळ असला तरी तो कमी व्हावा म्हणून दलजित यांना हा उपाय वाटतो. 

बांगलादेशविरुद्धची ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट 22 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर होणार आहे. कसोटी प्रकाशझोतात घ्यायचे ठरल्यामुळे त्यादृष्टिने पूर्वतयारीसाठी फारसा वेळ उपलब्ध नाही. 

या पार्श्‍वभूमीवर दलजीत म्हणाले की, कॅबला (बंगाल क्रिकेट संघटना) गुलाबी चेंडूवर दोन-तीन दिवसांचे सामने आयोजित करण्याचा थोडा अनुभव आहे. ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. दव हा चिंतेचा मुख्य मुद्दा असेल यात शंका नाही. तो पूर्णपणे निकालात काढता येणार नाही आणि ही प्रतिकूल बाब असेल हे त्यांना लक्षात घ्यावे लागेल. अशावेळी आउटफिल्डवरील गवत कमी हवे, जे पीचवरील नेहमीच्या गवतापेक्षा उंच असले पाहिजे. तेथील गवत जास्त असल्यास दव जास्त पडेल. गवत उंच असल्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ते फलदायी ठरेल. 

दोनच वर्षांपूर्वी प्रयोग 
खेळाची वेळ दुपारी 1.30 ते रात्री 8.30 अशी असण्याची अपेक्षा आहे. गुलाबी चेंडू जास्त टिकावा म्हणून पीचवर जास्त गवत लागेल. 2016 मध्ये दुलिप करंडक स्पर्धेचे सामने ग्रेटर नोएडामध्ये प्रकाशझोतात गुलाबी चेंडूवर झाले होते. दरम्यान दलजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असाच प्रयोग केला होता. तेव्हा चेंडू खूपच घाण होणे ही समस्या ठरली होती. 
असे दलजित यांनी सांगितले.

ऍडलेडमध्ये 11 मिलिमीटर गवत 
2017 मध्ये ऍडलेडमधील पहिल्या डे-नाईट कसोटीच्या वेळी पीचवर 11 मिलिमीटर गवत ठेवण्यात आले होते. असे गवत टिकवावे लागते. सामन्यापूर्वी काही दिवस हे गवत काढून टाकले जाऊ नये अन्यथा खेळपट्टी संथ होईल, असा मुद्दाही दलजित यांनी मांडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT