Former Cricketer Danish Kaneria Slam PCB Say Pakistan Cricket Board Is Weak esakal
क्रीडा

Danish Kaneria : BCCI च्या तुलनेत PCB दुबळे! पाकच्या माजी खेळाडूचा घरचा आहेर

अनिरुद्ध संकपाळ

Danish Kaneria PCB BCCI War : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यासाठी जाणार नाही असे ठणकावून सांगितल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही त्यावर प्रतिक्रिया दिली. पीसीबीने बीसीसीआयला पाकिस्तान 2023 मध्ये भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधून माघार घेणार अशी धमकी दिली. यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दिनेश कनेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला आहे.

दानिश कनेरिया म्हणाला की, 'बीसीसीआय असं करू शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याच्यावर कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. बीसीसीआय हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. आयसीसीच्या महसुलात बीसीसीआयचे 90 टक्के वाटा असतो. पाकिस्तान बीसीसीआयच्या भुमिकेशी फारकत घेऊ शकतो. मात्र इतर क्रिकेट बोर्डांनी देखील त्यांना साथ दिली पाहिजे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे सर्व क्रिकेट बोर्ड बीसीसीआय सोबत आहेत. त्यांना माहिती आहे की बीसीसीआयशिवाय कोणतेच पान हलत नाही.'

कनेरिया पुढे म्हणाला, 'भारतीय क्रिकेट बोर्ड हा खूप शक्तीशाली आहे. सध्याचे पीसीबी प्रशासन बरेच दुबळे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात काही कडक प्रशासक होते आता ते तेथे नाहीयेत. बीसीसीआय काय म्हणतं आहे त्याला त्यांना होकार द्यावाच लागले. याबाबत त्यांना फार वाईट वाटून घेण्याची गरज नाही. कारण ही परिस्थिती दोन्ही देशातील राजकीय घडामोडींमुळे झाली आहे. बीसीसीआयला पाकिस्तानमध्ये येण्यासाठी परवानगी मिळणार नाही.'

या परिस्थितीवर त्रयस्थ ठिकणी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा सल्ला कनेरियाने दिला. तो म्हणाला 'बीसीसीआय आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्रयस्थ ठिकाणी बैठक घ्यावी. ही बैठक ते दुबईत घेऊ शकतात, त्या ठिकाणी आयसीसीचे बरेच अधिकारी उपलब्ध असतील. तेथे या विषयावर एक तोडगा काढता येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT