former football player prasanta dora passes away
former football player prasanta dora passes away 
क्रीडा

भारताच्या माजी फुटबॉलपटूचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन 

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता - भारतीय फुटबॉल संघाचा माजी गोलकीपर प्रशांत डोरा याचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 44 व्या वर्षी प्रशांत यांचे अल्पशा आजारामुळे निधन झालं. प्रशांत डोरा यांचा मोठा भाऊ आणि भारताचा माजी गोलकीपर हेमंत यांनी याचाबाबत माहिती दिली. 

प्रशांत गेल्या काही काळापासून आजारी होते. डिसेंबरमध्ये त्यांना हेमोफॅगोसिटिक लिम्फोहिस्टोसायटोसिस आजाराचे निदान झाले होते. यामुळे प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. यामुळे संसर्गजन्य किंवा कर्करोगासारख्या आजाराला आमंत्रण मिळते. 

हेमंत डोरा यांनी सांगितलं की, प्रशांत यांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. डॉक्टरांना या आजाराचं लवकर निदान करता आलं नाही. त्याच्यावर टाटा मेडिकल इथं उपचार सुरु होते. सातत्यानं रक्त चढवण्यात येत होतं मात्र प्रशांतला वाचवता आलं नाही. मंगळवारी दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी त्याने अखेरचा श्वास घेतला. 

हेमंत आणि प्रशांत हे भारताकडून खेळणाऱ्या भावांच्या जोड्यांपैकी प्रसिद्ध अशी जोडी होती. प्रशांत यांनी 1999 मध्ये थायलंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यांनी सैफ कप आणि सैफ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलं होतं. तसंच 1997-98 आणि 1999 मध्ये संतोष ट्रॉफीमध्ये सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून पुरस्कार पटकावला होता. प्रशांत कोलकाता पोर्ट ट्रस्ट, मोहमेडन स्पोर्टिंग, मोहन बागान आणि इस्ट बंगालकडून खेळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT