Anju Bobby George And Shaili Singh  E sakal
क्रीडा

जॉर्ज दाम्पत्यानं घडवली 'शैली'; आता ऑलिम्पिक पदकाचं 'लक्ष्य'

शैलीचं कौतुक करताना दिग्गज अ‍ॅथलिट अंजू म्हणाली की, ती राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये सुधारणा करु शकते. आगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने शैलीच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्याचे आमचे लक्ष आहे.

सुशांत जाधव

भारताची अ‍ॅथलिट शैली सिंगने (Shaili Singh) नुकत्याच पार पडलेल्या अंडर 20 जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चंदेरी कामगिरी केली. नैरोबी येथे पार पडलेल्या स्पर्धेत तिने 6.59 मीटर अंतर उडी मारत रौप्य पदकाची कमाई केली. 17 वर्षीय शैलीने तिसऱ्या प्रयत्नात पदकाला गवसणी घालणारी उडी मारली. लांब उडीत अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2003 मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेतील कांस्य पदक विजेती अंजू बॉबी जॉर्ज (Indain Athelete Anju Bobby George) हिने देखील शैलीचे कौतुक केले आहे. माझ्या नावावर असलेला राष्ट्रीय रेकॉर्ड मोडण्याची क्षमता शैलीमध्ये आहे, असे मोठे वक्तव्य अंजू बॉबी जॉर्जनं केलय. अंजूच्या नावे 6.83 मीटरचा राष्ट्रीय विक्रम आहे. आगामी ऑलिम्पिकमध्ये शैली देशासाठी पदक मिळवून देऊ शकते, असेही अंजू बॉबी जॉर्जनं म्हटलंय.

शैलीचं कौतुक करताना दिग्गज अ‍ॅथलिट अंजू म्हणाली की, ती राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये सुधारणा करु शकते. आगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने शैलीच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्याचे आमचे लक्ष आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली जिंकलेले पदक स्वत: पदक मिळवण्याची अनुभूती करुन देणारे असेल, असा उल्लेखही अंजू बॉबी जॉर्ज यांनी केलाय. अंजूने 2004 मध्ये अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. या स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर राहिली होती. शैली सध्या अंजू बॉबी जॉर्जकडून सल्ला घेत असून अंजूचे पती रॉबर्ट बॉबी जॉर्ज या युवा खेळाडूला कोचिंग देत आहेत.

वयाच्या 14 व्या वर्षी शैलीने या क्रीडा प्रकारात पाउल टाकले. अंजू ज्यावेळी 20 वर्षांची होती त्यावेळी शैलीने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. शैलीने कोचिंगला लवकर सुरुवात केल्यामुळे तिचे भविष्य उज्वल असल्याचा मतही अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केले आहे.

विजयवाडा येथील राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलिटिक्स स्पर्धेत शैलीने रॉबर्ट यांना प्रभावित केले होते. सडपातळ आणि उंच मुलगीने त्यावेळी मारलेली उडी त्यांच्या लक्षात होती. पण ती मुलगी कोण ते त्यांना माहित नव्हते. घरी आल्यानंतर त्यांनी अंजूला त्या मुलीवर लक्ष ठेवायला सांगितले. आठवड्याभरात अंजू इंटर डिस्ट्रिक्ट ज्युनिअर चॅम्पियनशिपदरम्यान विशाखापट्टनममध्ये होती. यावेळी तिने शैलीला पाहिले. अन् तिची आपल्या पतीला भेट घालून दिली. या दोघांच्या पुढाकाराने शैली घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT