India vs Pakistan Asia Cup 2023 sakal
क्रीडा

PCB Chairman: भारताला आव्हान देणारे नजम सेठी निघाले पळपुटे; या व्यक्तीला मिळणार अध्यक्षपदाची गादी!

पाक मंडळाचे कार्याध्यक्ष नजम सेठी स्वतः मात्र पाक मंडळातील राजकारणचा बळी ठरले अन्....

Kiran Mahanavar

Pakistan Cricket Board : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी क्षुल्लक कारण देत बीसीसीआयची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असलेले पाक मंडळाचे कार्याध्यक्ष नजम सेठी स्वतः मात्र पाक मंडळातील राजकारणचा बळी ठरले. पुढच्या कार्यध्यक्षपदाच्या शर्यतीतून त्यांनी स्वतःहून माघार घेतली आहे.

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष असिफ झरदारी आणि पंतप्रधान शेहबाझ शरिफ यांच्यातील असलेल्या वादासाठी मला निमित्त व्हायचे नाही, असे स्पष्ट मत सेठी यांनी व्यक्त केले. सेठी यांच्या माघारीमुळे झाका अश्रफ पुन्हा पीसीबीचे अध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे.

सोमवारी रात्री उशिरा एका ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली आणि पाक क्रिकेट मंडळाच्या कारभारातून काढता पाय घेतला. असिफ झरदारी आणि शेहबाझ शरिफ यांच्यात सुरू असलेल्या वादासाठी मला निमित्त व्हायचे नाही.

अशी अनिश्चितता पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी चांगली नाही, त्यामुळे पीसीबीच्या पुढील कार्याध्यक्षपदासाठी मी उमेदवार नसेन, तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असे मत सेठी यांनी ट्विटरमध्य व्यक्त केले आहे. यावरून पाक क्रिकेट मंडळात सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट होते. या घडामोडीचा परिणाम पाक संघावर आगामी आशिया करंडक आणि विश्वकरंडक स्पर्धेसाठी होऊ शकतो.

पाकिस्तानमध्ये राज्यकर्त्या पक्षाचे नेहमीच पाक मंडळाच्या प्रशासनात प्राबल्य राहिले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी यांच्या युतीचे सरकार आहे आणि हे दोन्ही पक्ष आपापले उमेदवार पीसीबीच्या कार्याध्यक्षपदासाठी पुढे करत आहेत.

पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) अश्रफ यांच्यासाठी इच्छुक आहे. सेठी यांना कार्याध्यक्षपदावर जबरदस्तीने आणलले आहे, असाही आरोप पीपीपी यांनी केला आहे तसेच २०१४ च्या घटनेनुसार नव्याने निवडणूका घेण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. सेठी यांनी पुन्हा निवडणूक लढवली तर व्यावसायिक हीतसबंधांचा कायदेभंग असेल, असे पीपीपीचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजुला शरिफ गटातर्फे सेठी यांनी पुन्हा निवडणूक लढवावी असा आग्रह आहे.

सेठी आणि झाका यांच्यात या अगोदरही पाक क्रिकेट मंडळाच्या कार्याध्यक्षपदासाठी लढा झालेला आहे. त्यावेळीही या दोन्ही उमेदवारांना त्यांचा त्यांचा राजकिय पाठिंबा होता. त्यात सेठी यांनी बाजी मारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT