PCB chairman Shaharyar Khan passes away Marathi News
PCB chairman Shaharyar Khan passes away Marathi News sakal
क्रीडा

Shaharyar Khan passes away : पाकिस्तान क्रिकेटच्या माजी अध्यक्षाचे निधन, सैफ अली खानच्या घराण्याशी आहे थेट कनेक्शन

Kiran Mahanavar

Shaharyar Khan News : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांनी शनिवारी वयाच्या 89 व्या वर्षी लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. शहरयार खानच्या मृत्यूला पीसीबीने दुजोरा दिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष मोहसिन अध्यक्ष यांनी ट्विट केले आणि लिहिले की, पीसीबीच्या वतीने मी माजी अध्यक्ष शहरयार खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. ते एक चांगले प्रशासक होते आणि त्यांनी अत्यंत समर्पणाने पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली.

शहरयार खान यांचे भारतातल्या भोपाळच्या नवाब घराण्याशी थेट नाते आहे. शहरयार यांची आई बेगम आबिदा सुलतान या भोपाळच्या राजकुमारी होत्या. तत्कालीन नवाब हमीदुल्ला खान यांच्या त्या थोरल्या सुपुत्री. वडिलांच्या नंतर त्याच भोपाळच्या गादीच्या वारसदार होत्या. मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांच्या पतीने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला आणि आबिदा सुलतान यांनी भोपाळच्या गादीवरील आपला हक्क सोडला.

पुढे ही गादी त्यांच्या धाकट्या बहिणीकडे नवाब बेगम साजिदा सुलतान यांच्याकडे गेली. या साजिदा सुलतान म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटर टायगर पतौडी यांची आई. या नात्याने शहरयार खान हे टायगर पतौडी यांचे मावस भाऊ व अभिनेता सैफ अली खान यांचे काका होत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2006 आणि ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत त्यांनी पीसीबीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. शहरयार खान यांनी 1999 च्या भारत दौऱ्यात आणि ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2003 दरम्यान पाकिस्तान पुरुष संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT