Unmukt Chand  E Sakal
क्रीडा

दिल्लीच्या पठ्ठ्यानं पाकिस्तानी क्रिकेटरला तोंडावर आपटले

28 वर्षीय उन्मुक्त चंद याने पाकिस्तान क्रिकेटरचा दावा फेटाळून लावलाय.

सुशांत जाधव

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत (US) क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका टी-20 लीगच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा जोर धरत असताना पाकिस्तानचा क्रिकेटर समी असलम (Sami Aslam Pakistani Cricketer) याने भारतीय अंडर 19 संघाचे नेतृत्व केलेला उन्मुक्त चंद (Unmukt Chand ) अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार असल्याचा दावा केलाय. उन्मुक्त चंद नुकताच अमेरिकेला गेला होता. त्यामुळे हा भारतीय खेळाडू अमेरिकेच्या संघाकडून प्रतिनिधीत्व करणार का? या चर्चेला उधाण आले आहे. मात्र 28 वर्षीय उन्मुक्त चंद याने पाकिस्तान क्रिकेटरचा दावा फेटाळून लावलाय.

प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना उन्मुक्त चंद म्हणाला की, अमेरिकेत जाण्यामागे असा कोणताही हेतू नव्हता. नातेवाईंकाना भेटण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी अमेरिकेत फलंदाजीचा सराव केला. अमेरिकेतील एका ट्रेनिंग सेशनमध्ये भाग घेतला असला तरी कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाही. अमेरिकेकडून खेळणार ही एक अफवा आहे. अमेरिका दौरा हा केवळ भटकंतीचा एक भाग होता, असा उल्लेखही त्याने केलाय.

बीसीसीआयचा नियम काय सांगतो

बीसीसीआयच्या (BCCI) नियमानुसार, भारतीय क्रिकेटशी संलग्नित असलेल्या कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेतल्याशिवाय कोणत्याही इतर देशातील फ्रेंचायझीसोबत करारबद्ध होता येत नाही. या नियमामुळेच परदेशी लीगमध्ये खेळण्याच्या उद्देशानेच युवराज सिंगने निवृत्ती घेतली होती. एवढेच नाही तर हरभदन सिंगला एका स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

उन्मुक्त चंदची कारकिर्द

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर 19 संघाने वर्ल्ड कप जिंकला आहे. या कामगिरीनंतर उन्मुक चांगलाच चर्चेत आला. पण त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. 67 प्रथम श्रेणीत त्याच्या खात्यात 3379 धावांची नोंद असून लिस्ट एमधील 120 मॅचमध्ये त्याने 4 हजार 505 धावा केल्या आहेत. या फलंदाजाने 77 टी-20 मध्ये 1564 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT