West Indies Cricket Team esakal
क्रीडा

पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डात खळबळ; 'सिलेक्टर'नं दिला राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

'सरवाननं त्याचा कार्यकाळ पूर्ण केला नाही, याबद्दल आम्हाला खेद वाटतो.'

वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा अजून सुरू झालेला नाहीय. हा संघ सध्या नेदरलँडच्या दौऱ्यावर आहे. पण, या दोन देशांच्या दौऱ्यासाठी संघाची निवड करणाऱ्या एका निवडकर्त्यानं (West Indies Cricket Board) अचानक राजीनामा दिलाय. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा सिलेक्टर रामनरेश सरवान (Ramnaresh Sarwan) यानं तत्काळ आपलं पद सोडलंय.

यामागचं कारण सरवाननं वैयक्तिक असल्याचं सांगितलंय. सरवानचा कार्यकाळ 2024 च्या मध्यापर्यंत होता. मात्र, त्यानं अवघ्या 5 महिन्यांत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सरवानच्या राजीनाम्यानंतर, वेस्ट इंडिज संघाचा माजी लेग-स्पिनर रॉबर्ट हेन्स (Robert Haynes) सध्या संघाचा कार्यभार पाहतील. दरम्यान, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड नव्या निवडकर्त्याच्या शोधात व्यस्त असल्याचं कळतंय. रॉबर्ट हेन्स हा वेस्ट इंडिजच्या ज्युनियर संघाचा निवडकर्ता देखील आहे.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जिमी अॅडम्स (Jimmy Adams) म्हणाला, 'रामनरेश सरवाननं त्याचा कार्यकाळ पूर्ण केला नाही, याबद्दल आम्हाला खेद वाटतो. पण, आम्ही सरवनच्या निर्णयाचा आदर करतो. सरवनचा राजीनामा स्वीकारला असून सरवनच्या योगदानाबद्दल आम्ही त्याचं आभारी मानतो. आशा करतो की, भविष्यात तो पुन्हा वेस्ट इंडिज क्रिकेटला पुढं नेण्यात आपलं योगदान देईल.' दरम्यान, वेस्ट इंडिज क्रिकेटच्या निवड समितीचं नेतृत्व सध्या डेसमंड हेन्स आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स करत आहेत. सरवनच्या राजीनाम्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आता लवकरात लवकर नवीन निवडकर्त्याच्या शोधात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT