Narsingh Yadav  Sakal
क्रीडा

Narsingh Yadav : माजी कुस्तीगीर नरसिंग यादवची चेअरमनपदी निवड

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या नरसिंग यादव याची भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलीटस्‌ कमिशनच्या समितीत निवड करण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या नरसिंग यादव याची भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलीटस्‌ कमिशनच्या समितीत निवड करण्यात आली आहे. या समितीत एकूण सात जणांचा समावेश आहे. माजी कुस्तीगीर नरसिंग यादव याची या समितीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेची नव्याने निवडणूक पार पडली; मात्र भारतातील काही कुस्ती खेळाडूंकडून नवी दिल्लीत आंदोलन करण्यात आल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या कार्यकारिणीला निलंबित करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवरील बंदी उठवण्यात आली; पण खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचला, असेही जागतिक कुस्ती संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अद्याप भारतीय कुस्ती संघटनेवरील बंदी उठवण्यात आलेली नाही.

भारतीय कुस्ती संघटनेकडून निवडण्यात आलेल्या समितीत नरसिंग यादवसह साहिल (नवी दिल्ली), स्मिता ए. एस. (केरळ), भारती भागेई (उत्तर प्रदेश), खुशबू एस. पवार (गुजरात), निक्की (हरियाना) व श्‍वेता दुबे (बंगाल) या व्यक्तींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT