Car
Car 
क्रीडा

हृदयद्रावक! कार अपघातात 4 राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशातील होशिंगाबाद येथे हृदयद्रावक घटना घडली असून, कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होशिंगाबादजवळ आज सकाळी हा अपघात झाला. यात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. ध्यानचंद्र ट्रॉफी खेळण्यासाठी जाताना हा अपघात झाला. इटारसीहून होशंगाबादच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 वर राईसलपूरजवळ त्यांची कार झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती, की चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाहनचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. या हॉकीपटूंची नावे समजू शकली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT