France vs Morocco FIFA World Cup 2022  
क्रीडा

FIFA WC22: मोरोक्कोचे स्वप्न भंगले! गतविजेत्या फ्रान्सचा धडाका; फायनलमध्ये मेस्सीशी लढत

Kiran Mahanavar

France vs Morocco FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तेथे त्याचा सामना 18 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होईल. त्याचवेळी मोरोक्कोच्या पराभवामुळे आफ्रिकन आणि अरब देशांचे स्वप्न भंगले. तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत आता 17 डिसेंबरला क्रोएशियाशी लढत होईल.

फ्रान्सने बलाढ्य मोरोक्कन संघाचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. फ्रान्ससाठी सामन्यातील पहिला गोल थियो हर्नांडेजने पाचव्या मिनिटाला केला. त्याच्यानंतर 79व्या मिनिटाला रैंडल कोलो माउनीने संघासाठी दुसरा गोल केला.

फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2018 मध्ये त्याने अखेरच्या विजेतेपदाच्या सामन्यात क्रोएशियाचा पराभव केला होता. त्यानंतर 1998 नंतर तो चॅम्पियन बनला. फ्रान्स तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. रविवारी अंतिम फेरीत त्याचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने उपांत्य फेरीत क्रोएशियाचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT