Sports 
क्रीडा

खेळांडूनो थोडं जपूनच!

राष्ट्रीय स्पर्धेचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची स्वप्ने दाखवली जात आहेत.

सुयोग घाटगे

राष्ट्रीय स्पर्धेचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची स्वप्ने दाखवली जात आहेत.

कोल्हापूर : कोरोना लाट ओसरल्यानंतर सुरू होत असलेल्या क्रीडा क्षेत्राचा गैरफायदा घेण्याची तयारी काही स्पर्धा आयोजकांनी केली आहे. खेलो इंडिया, फिट इंडिया, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलंपिकसारखे शब्द वापरात खेळाडूंना जाळ्यात ओढण्याचे आणि आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. या स्पर्धांत सहभागासाठी मिळणारे कोणतेच प्रमाणपत्र शाळा प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

जागतिक क्रीडा संघटनांशी संलग्न असल्याचे भासवत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंना 'गळ' घालण्याच्या प्रकारांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची स्वप्ने दाखवली जात आहेत. गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करून यातून आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागाची होणार असल्याची जाहिरात सोशल मीडियावर केली जात आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी खेळाडूंचा सावज टिपण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

राष्ट्रीय संघटन आणि आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न असल्याचे भासवत तसेच ऑलंपिक, खेलो इंडिया, फिट इंडिया सारखी अधिकृत नावाचा गैर वापर करत क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचे गाजर खेळाडूंना दाखवले जात आहे. या स्पर्धेत जवळपास सर्वच वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धा असल्याचे सांगत खेळाडूंनी भाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. याबाबत अनेक क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता फसव्या स्पर्धांपासून आणि जाहिरातबाजी पासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.

ग्रामीण खेळाडू अधिक टार्गेट

थ्री स्टार हॉटेल मध्ये २ रात्र तीन दिवस राहणे, ७ वेळचे खाणे , सहभाग प्रमाणपत्र, मेडल आणि संघाला मानचिन्ह अशी जाहिरात करताना नोंदणीसाठी निनावी संपर्क क्रमांक दिले आहेत. खेळाडूंना प्रत्यक्ष गाठून त्यांना या स्पर्धेतील सहभागासाठी गळ घातला जात आहे. १० ते १५ हजाराची रक्कम घेऊन मडगाव, गोवा येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत सहभागी करून घेतले जात आहे. यात ग्रामीण भागातील खेळाडूंना अधिक टार्गेट केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT