Stefanos Tsitsipas and Alexander Zverev news agency
क्रीडा

French Open : अखेर 'त्सित्सि' सेमीफानलमध्ये 'पास'

सुशांत जाधव

ग्रीसचा पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास (Stefanos Tsitsipas) याने जागतिक टेनिस क्रमवारी सहाव्या स्थानावावर असलेल्या जर्मनीच्या झ्वेरेव्हला अँलेक्झांडर (Alexander Zverev) याला पराभूत करत फ्रेंच ओपन स्पर्धेची फायनल गाठली. दोघांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळाला. सुरुवातीला त्सित्पिपासने आघाडी आपल्याकडे ठेवली. पण पुढील दोन सेटमध्ये गेम झ्वेरेव्हच्या बाजूने झुकला. त्याने सामन्यात बरोबरी साधली. शेवटचा सेट जिंकण्यात तो अपयशी ठरला. गीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने 6-3, 6-3, 4-6, 4-6, 6-3. असा विजय नोंदवत पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. (French Open 2021 Greek Stefanos Tsitsipas beat German Alexander Zverev in semi finals match And Reach Final)

यापूर्वी 2019 मध्ये त्सित्सिपासने ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. यावेळी राफेल नदालने त्याला पराभूत केले. गतवर्षीही तो फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलपर्यंत पोहचला. तेव्हा नोव्हाक जोकोव्हिचने त्याचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपुष्टात आणला होता. अखेर यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची फायनल गाठली आहे.

जोकोविच आणि नदाल यांच्यातील विजेत्याशी तो आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम विजयासाठी कोर्टवर उतरेल. पहिल्या दोन सेटमध्ये स्टेफानोस त्सित्सिपास याने निर्विवाद वर्चस्व राखले. त्याने 6-2, 6-2 अशा फरकाने अँलेक्झांडर झ्वेरेव्हला बॅकफूटवर ढकलले. पण सहजासहजी सामना सोडणार नसल्याचे संकेत देत झ्वेरेव्हने तिसऱ्या सेटमध्ये कमबॅक केले. पुढील दोन सेट 6-4, 6-4 जिंकत त्याने सामन्यात दमदार कमबॅक केले. पाचव्या सेट 6-3 असा जिंकूत त्सित्सिपास याने पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

Western Railway: पश्चिम रेल्वेचा नवा उपक्रम! मुंबईच्या 'या' स्टेशनवर देशातील पहिले को-वर्किंग स्पेस सुरू, एका तासाचे दर किती?

Hijab Controversy Update : हिजाब विवादात नवीन अपडेट!, नुसरत परवीन नोकरी करणार, कुटुंबही नाराज नाही

1xBet Case: युवराज सिंग, उर्वशी रौतेला, सोनू सूदसह अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त; ईडीची मोठी कारवाई, कारण काय?

नागपूरमध्ये डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, दोन कोटींची मागितली खंडणी, सात जणांना अटक; गुन्हे शाखेने कसा रचना सापळा?

SCROLL FOR NEXT